बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

लहान बहिणीला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करुन तिला मोबाइलमध्ये काढलेले फोटो सगळ्यांना दाखवून तुझी बदनामी करिन, असे म्हणून तिच्याकडून पैसे वसुल करणाऱ्या २३ वर्षीय नराधमाला शुक्रवारी (ता.२६) रात्री एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. अनिस शब्बीर पठाण असे आरोपीचे नाव आहे.

औरंगाबाद: लहान बहिणीला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करुन तिला मोबाइलमध्ये काढलेले फोटो सगळ्यांना दाखवून तुझी बदनामी करिन, असे म्हणून तिच्याकडून पैसे वसुल करणाऱ्या २३ वर्षीय नराधमाला शुक्रवारी (ता.२६) रात्री एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. अनिस शब्बीर पठाण असे आरोपीचे नाव आहे.

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार

प्रकरणात १६ वर्षीय मुलीने तक्रार दिली. तक्रारीनुसार, पिडिता राहत असलेल्या परिसरात आरोपी अनिस हा मित्रांसोबत फिरत असायचा. नऊ-दहा महिन्यांपूर्वी आरोपीने पिडितेच्या घरच्या मोबाइलवर फोन करून तु मला खूप आवडते, मला भेटायला ये असे म्हणाला. मात्र पिडिता भेटण्यास गेली नाही. भेटायला न आल्यास छोट्या बहिणीला मारुन टाकीन अशी धमकी तो द्यायचा.

पिडिता घरी एकटी असतांना आरोपी तिच्या घरी येऊन बोलली नाही तर, बहिणीला मारुन टाकीन आणि तुझ्या आईची बदनामी करीत अशी धमकी द्यायचा. सप्टेंबर २०१९ दरम्यान आरोपीने पिडितेला फोन करुन एका केमिकल कंपनीजवळ असलेल्य गोडाऊनमध्ये भेटायला बोलावले. धमक्यांमुळे घाबरलेली पिडिता गोडावूनमध्ये गेली.

हेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम

नंतर आरोपीने पिडितेला मित्राच्या घरी बोलावले व तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास बहिणीला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पिडितेला मित्राच्या घरी बोलावत वारंवार बलात्कार केला. २० जून रोजी आरोपीने पिडितेला गोडावुनमध्ये बोलावले व तेथेदेखील तिच्यावर अत्याचार केला. 

पैसे दे नाहीतर फोटोच दाखवतो 
गेल्या दोन महिन्यापासून आरोपी मला पैसे आणून दे अन्यथा मोबाइल मधील फोटो सगळ्यांना दाखवून तुझी बदनामी करीन अशी धमकी द्यायचा. त्यामुळे पिडितेने आरोपीला एकदा चार व एकदा पाच असे सुमारे ९ हजार रुपयेही दिले. दरम्यान २५ जून रोजी आरोपीने पिडितेला फोन करुन भेटायला बोलावले.

हेही वाचा- सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश

त्यानुसार पिडिता गेली असता अरोपीने तिच्याकडे सात हजारांची मागणी केली. मात्र पिडितेने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने पिडितेला दगडाने मारहाण करुन जखमी केले. पिडितेने घरी गेल्यावर आपल्या आईला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी 

आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला ३० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.बी. पारगांवकर यांनी शनिवारी (ता.२७) दिले. सुनाणीदरम्यान आरोपीची वैद्यकिय तपासणी करणे आहे, तसेच मोबाईल जप्त करणे आहे आदी तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी न्यायालयाकडे केली. 

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Custody to Accused Aurangabad Crime News