धक्कादायक: दूध न दिल्याचा इतका राग...थेट दोघांनी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

दूध न दिल्याच्या कारणावरुन तरुणावर प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकाला शनिवारी (ता.३०) सकाळी गजाआड केले. मोहम्मद इसाक मोहम्मद शब्बीर (२२, रा. सादात नगर, रेल्वे स्टेशन) व मीर अमीर अली उर्फ मिया तलवार मरी हुसैन अली (४५, रा. लोटा कारंजा) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

औरंगाबाद: दूध न दिल्याच्या कारणावरुन तरुणावर प्राण घातक हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकाला शनिवारी (ता.३०) सकाळी गजाआड केले. मोहम्मद इसाक मोहम्मद शब्बीर (२२, रा. सादात नगर, रेल्वे स्टेशन) व मीर अमीर अली उर्फ मिया तलवार मरी हुसैन अली (४५, रा. लोटा कारंजा) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: CoronaUpdate: औरंगाबादेत आज २८ रुग्णांची वाढ, एकूण @१४८७

आरोपींना रविवारपर्यंत (दि. ३१) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी दिले. प्रकरणात शुक्रवारी (ता.२९) आरोपी दरक्षा बेगम उर्फ पिंकी मोहम्मद इसाक (२०, रा. मोमीनपुरा, लोटा कारंजा) व शेख नदीम शेख चांद  (२१, रा. सादात नगर, रेल्वेस्टेशन) या दोघांना अटक करण्यात आली होती. आरोपींपैकी दरक्षा उर्फ पिंकीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर आरोपी शेख नदीमच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले.

हेही वाचा-  व्हिडिओ पाहा : तब्बल सहा लाखांचे रॉमटेरियल जळून खाक

प्रकरणात जखमी मोहम्मद काशीफोद्दीन सिदृीकी मोहम्मद नसीमोद्दीन सिद्दीकी (२५, रा. मोमीनपुरा, लोटा कारंजा) याने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, मोहम्मद सिद्दीकीचा दुधाचा व्यवसाय आहे. २० मे रोजी सायंकाळी आरोपी इसाक व शेख नदीम या दोघांनी दुधाचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन मोहम्मदला सिद्दीकीला बेदम मारहाण केली. आरडाओरडा ऐकून आरोपी इसाकची पत्नी दरक्षा व त्यांचा नातेवाईक मिया तलवार हे दोघे धावत आले व त्यांनी देखील मोहम्मदला मारहाण केली. तर इसाकने मोहम्मदवर चाकुने वार करुन गंभीर जखमी केले. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्याज आज अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, गुन्ह्यात वापरलेला चाकु जप्त करणे आहे, त्याचवेळी गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणीसाथीदार आहेत का याचा देखील तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.
हे वाचलंत का? ६५ वर्षीय पत्नीला आधी काठीने मारले, पण जीव जाईना म्हणून...अखेर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Custody to Two Accussed Aurangabad News