व्हिडिओ पाहा : तब्बल सहा लाखांचे रॉमटेरियल जळून खाक

Fire News
Fire News

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील जकेकूर-चौरस्ता औद्योगिक वसाहतीतील धान्याच्या भूश्यापासुन तयार केले जाणाऱ्या इंधनाच्या रॉमटेरियला गुरुवारी (ता. २८) दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत तब्बल सहा लाख रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.

 दरम्यान आग विझवण्यासाठी उमरगा पालिकेची आग्नीशमन दलाची गाडी व दोन ट्रॅक्टर टँकरमधील पाण्याने प्रयत्न केला. मात्र रात्री उशीरापर्यंत धूराचे लोट सुरूच होते. याबाबतची माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीत पूणे येथील श्रीकांत मोरे यांचा बॉयलरसाठी इंधन म्हणून धान्याच्या भुश्यापासुन गट्टू तयार करण्याचा प्लॅन्ट आहे. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास प्लॅन्टच्या मैदानात रॉमटेरियलला (सोयाबीन, हरभरा व तूरीचा भूसा) अचानक आग लागली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आग लागल्याचे दिसताच तेथील कामगारांनी मालकाला माहिती दिली.पालिकेची आग्नीशमन दलाची गाडी व दोन ट्रॅक्टर टँकरमधील पाण्याच्या सहाय्याने  आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला, आग आटोक्यात आली असली तरी रात्री उशीरापर्यंत धूराचे लोट सुरूच होते.

औरंगाबादेत आज वाढले ३५ रुग्ण, एकूण १३९७ पॉझिटिव्ह

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना आणि इतर आजारांचे बळींचे सत्र थांबता थांबत नसून पुन्हा यात मकसूद कॉलनी, इंदिरानगर बायजीपुरा, हुसेन कॉलनी, माणिकनगर गारखेडा, रोशनगेट, रहिमनगर परिसरातील सहा जणांचे २६ व २७ मे रोजी कोरोना आणि इतर आजाराने बळी गेले. त्यामुळे औरंगाबादेतील एकूण मृत्यू ६५ झाले आहेत.
औरंगाबादेत सलग सातव्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येतही कमालीची घट दिसून आली. आज (ता. २८) ३५ रुग्ण वाढले.

गत सहा दिवसात अनुक्रमे ३२ व ३०, ३७, २०, ३० व ३२ रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी ( ता. २८) ३५ रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार ३९७ झाली. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेषतः पूर्वीपेक्षा टेस्टिंग कमी होत असून दुसरीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com