esakal | औरंगाबादमध्ये‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त, कोरोना संसर्गाचे भान ठेवण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

14New_Year_Celebration

नववर्षाच्या स्वागतासाठी यंदाच्या जल्लोषावर कोरोनाचे विरजण असले तरीही बंदोबस्तात मात्र तसूभरही कमतरता नसून तब्बल एक हजार पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी शहरात तैनात करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त, कोरोना संसर्गाचे भान ठेवण्याचे आवाहन

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : नववर्षाच्या स्वागतासाठी यंदाच्या जल्लोषावर कोरोनाचे विरजण असले तरीही बंदोबस्तात मात्र तसूभरही कमतरता नसून तब्बल एक हजार पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी शहरात तैनात करण्यात आला आहे. नववर्षाचे स्वागत करतानाच कोरोना संसर्गाचे भान व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले.
दरवर्षी नववर्षाचे स्वागत मोठ्या आनंदात केले जाते. अनेक हॉटेल्स व ढाब्यांसह विविध स्थळी पार्ट्या केल्या जातात. परंतू यंदाचे वर्ष सर्वांसाठी दुःखदायक ठरले. कोरोनामुळे अनेक बंधने आली. हीच बंधने व कोरोनाचे सावट नव्या वर्षात पदार्पण करतानाही सोबतीला आहेत. गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.असा आहे बंदोबस्त
- दोन पोलिस उपायुक्त, पाच सहायक आयुक्त
- २१ पोलिस निरीक्षक, १२९ सहायक व उपनिरीक्षक
- ७४४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर असतील.


मद्य पिऊन वाहन चालविणारे टार्गेट
फिक्स पॉईंट लावण्यात येणार असून दुचाकीवरूनही पोलिस गस्त घालतील. महिला छेडछाड विरोधी व ध्वनी प्रदूषण, पोस्टर-बॅनरविरोधी पथकही तैनात करण्यात येतील. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधातही मोठी कारवाई हाती घेण्यात आली आहे.


शासनाच्या आदेशानुसार सर्वांनी आपल्या घरी साधेपणाने व आनंदात नववर्षाचे स्वागत करावे. शासकीय वेळेनंतर नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये. साथरोग कायदा तसेच जमावबंदीचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करणार आहोत. ती वेळ कुणावर येऊ नये.
-निखील गुप्ता, पोलिस आयुक्त

Edited - Ganesh Pitekar