पोलिसांचा गनिमी कावा टोळीला कळलाच नाही, आणि खपले... 

बाळासाहेब लोणे
शुक्रवार, 20 मार्च 2020

गंगापूर : येथील पोलिसांनी शासकीय वाहन न वापरता खासगी वाहनाचा आधार घेऊन दुचाकी चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिस ठाण्यात दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हयाचे तपासात पोलीसांनी ही धडक कामगिरी बजावली. यात अकरा दुचाकी जप्त करत आरोपींना जेरबंद केले.

गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री व शुक्रवारी (ता. २०) ही कारवाई करण्यात आली. आरोपी दिलीप सर्जेराव डोखळे (वय ३५, रा. दिघी ता. गंगापुर) व संजय भागीनाथ जाधव (वय ८६ रा. आजवाननगर, वाळुज ता.गंगापुर) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातील चोरीच्या तब्बल ११ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

मोटार सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. १९) फिर्यादी शेख कासम शेख बंडू (रा. भालगांव, ता. गंगापुर) यांनी सीडी डिलक्स मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन चौधर व तपास अंमलदार गणेश खंडागळे यांनी आपली गोपनीय यंत्रणा कामाला लावली. 

असा घातला छापा...

त्यानुसार दिधी येथील दिलीप डोखळे व वाळूज येथील संजय जाधव यांनी या गाड्या चोरल्याचे त्यांना समजले. आरोपी पळून जाू नयेत, यासाठी पोलिसांनी आपले वाहन नेण्याचे टाळले. त्यांनी एका खासगी वाहनाची मदत घेतली आणि छापे घातले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडून चोरून नेलेली हिरो सीडी डिलक्स जप्त केलीच. शिवाय त्यांना पोलिसी खाक्या दाखवला, तर त्यांनी इतर ठिकाणांहून चोरून नेलेल्या दहा मोटार सायकलीदेखील सापडल्या. आरोपींनी या गाड्या पाचोड, पैठण, एमआयडीसी वाळूज, नेवासा, राहाता, सोनई, जळगाव येथून चोरून आणल्या होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Raid Two Wheeler Thieves Arrested In Gangapur Aurangabad