पोलिसांचा विरंगुळा : दांडूका ठेवला खाली, हाती घेतली बॅट, अन् त्यांनी सुरू केले धो..धो..धूवायला..! 

polis 2.jpg
polis 2.jpg

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संकटात गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून लॉकडाऊनमुळे आँन ड्युटी चोवीस तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले. पोलिसांनी हातातील दांडुका बाजुला ठेवून बॅट आणि बॉल हातात घेत क्रिकेटचा आनंद लुटला. विशेष म्हणजे पोलिसांच्या या खेळाचे व्हिडीओ चांगलेच व्हयरल झाल्याने एरव्ही रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची जागा पोलिसांनी घेतल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत होत्या.

शहरात सध्या कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करत संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे पोलिसांवरील ताण काहीसा हलका झाला. त्यामुळेच पोलिसांनी सहकाऱ्यांसोबत क्रिकेट खेळत काहीसा शीण घालवला. खाकी वर्दी म्हटले की सामान्यांच्या मनात एक वेगळे चित्र निर्माण होते. पण वेळ, काळ, प्रसंग पाहून कधीतरी पोलिसांना कठोर व्हावे लागते ही वस्तुस्थिती आहे.

कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता अबाधित राखण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. पण पोलिसांमध्ये देखील माणुसकी आणि सह्दय माणूस लपलेला असतो याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. कोरोनामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्तावर तैनात आहेत. परिणामी सहाजीकच त्यांच्यावर मानसिक ताण येतो. सध्या शहरातील शहागंज या मध्यवस्तीच्या भागात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करणे, वाहनांची तपासणी मोहिम सध्या पोलिसांकडून राबवली जात आहे. संचारबंदीला लोकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना थोडीशी उसंत मिळाली. त्यामुळे त्यांनी खुर्चीचा स्टंप, बॅट आणि चेंडूची व्यवस्था करत जोरदार फटकेबाजी केली.

(संपादन : प्रताप अवचार) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com