
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय केणेकर व पदाधिकाऱ्यांना शनिवारी (ता.१२) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले.
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय केणेकर व पदाधिकाऱ्यांना शनिवारी (ता.१२) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री शहरातून परत जाईपर्यत त्यांना सिडको पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. सरकारने जाणिवपूर्वक पोलिसांच्या माध्यमातून आम्हाला रोखल्याचा आरोप श्री. केणेकर यांनी केला.
मोठी खुर्ची हटवून मुख्यमंत्री ठाकरे बसले साध्या खुर्चीवर, आपणही सामान्य असल्याचा दिला संदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज १६८० कोटीच्या पाणीपुरवठा व इतर विकास योजनच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना या योजनेत महापालिकेस ३० टक्के रक्कम भरणा करण्याची करार झाला आहे. हा ६३१ कोटीचा भार महापालिकेवर टाकू नयेत, तो सरकारने उचलावा, या मागणीचे निवेदन देण्यात येणार होते. मात्र दुपारी साडे बारा वाजता वोखार्ड चौकात शहराध्यक्ष संजय केणेकर व सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवले. ताब्यात घेत सिडको पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुख्यमंत्री गेल्यावर केणेकर व सहकाऱ्यांना सोडून देण्यात आले.
दरम्यान केणेकर यांना ताब्यात घेतल्याचे कळल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात घोषणाबाजी केली. यावेळी आमदार अतुल सावे, भगवान घडामोडे, राज वानखेडे, राजेश मेहता, शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, माधुरी अदवंत, मनिषा भन्साळी,अरूण पालवे, सिध्दार्थ साळवे, शालिनी बुंधे, लता सरदार आदींचा समावेश होता.
Edited - Ganesh Pitekar