
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांनी दिली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या वर्षी ‘एम.फिल प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने यशस्वीपणे राबविण्यात आली.
कोविडच्या पाश्र्वभुमीवर यंदाची प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) रद्द करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. पदवीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येईल. राज्यशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मात्र ‘सीईटी‘ बंधनकारक असणार आहे. या संदर्भात प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅ. डॉ.सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांच्या उपस्थितीत कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले.
असे असेल वेळापत्रक
- ता. ८ ः विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी.
- ता. ११ ः प्राथमिक यादी
- ता. १६ ः प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रकाशित
- ता. २८ ः दुसरी यादी
- ता. ३ ः तृतीय यादी व स्पॉट अॅडमिशन
- ता. २८ ः पदव्यूत्तर विभागाच्या तासिका सुरु
-------