esakal | औरंगाबादेत रावसाहेब दानवेंच्या विरोधात ‘प्रहार’चे पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Prahar Agitation Against Raosaheb Danve

औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात गुरूवारी (ता.दहा) आंदोलन सुरु आहे.

औरंगाबादेत रावसाहेब दानवेंच्या विरोधात ‘प्रहार’चे पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद :  औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात गुरूवारी (ता.दहा) आंदोलन सुरु आहे. फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील एका कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले होते, कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात प्रहारतर्फे पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु आहे.

केंद्रीय मंत्री दानवे माफी मागत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. साधारण दुपारी साडेबाराच्या आसपास या आंदोलनास सुरवात झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वादग्रस्त विधानाचे निषेध करण्यात आले आहे. तत्पूर्वी संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दानवेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांना म्हणाले, की आता दानवेंचा डीएनए चेक करावा लागेल. तो नेमका अमेरिकेतला, चीन किंवा पाकिस्तानचा आहे. आम्ही भारत सरकारला त्यांच्या डीएनए चेक करण्याची विनंती करणार आहे.  


संपादन - गणेश पिटेकर