
दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी (ता.नऊ) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद येथील शिवाजीनगरमधील निवासस्थाना समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद : दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी (ता.नऊ) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद येथील शिवाजीनगरमधील निवासस्थाना समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मोडित काढण्यासाठी पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त लावलेला होता. तरीही गनिमी काव्याने आंदोलन करण्यात आले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्या अनुषंगाने रावसाहेब दानवे यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. यात प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत, वैजापुरचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, युवा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सावंत, विशाल शिंदे, पंकज बनसोडे, विजय वाहुळ, दीपक चिकटे, शेख युसूफ आदींनी सहभाग नोंदवला.
संपादन - गणेश पिटेकर