
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. एका वर्षात हे शक्य नाही; मात्र पाच वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
औरंगाबाद : देशातील सार्वजनिक क्षेत्र मल्टिनॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांना विकण्याचा सरकारचा घाट आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारचा हा डाव लोकांसमोर आणणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता.27) त्यांनी औरंगाबादेत दिली.
बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार, एनसीआर, बेळगाव सीमा प्रश्न यासह विविध मुद्यांवर आपले मत मांडले.
ऍड. आंबेडकर म्हणाले, "महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. पाच वर्षे टिकले पाहिजे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सरकार पाच वर्षे चालवण्याची जबाबदारी तीन पक्षांची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. एका वर्षात हे शक्य नाही; मात्र पाच वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा,'' असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले.
अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात
ते म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भेट झाली तेव्हा एनआरसीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या कायद्यामुळे फक्त मुस्लिमच बाधित होणार असा त्यांचा समज होता; पण या कायद्याचा परिणाम केवळ मुस्लिमांवरच नाही तर देशातील चाळीस टक्के हिंदूंवरदेखील होणार आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर एनआरसी महाराष्ट्रात आपण लागू करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले,'' अशी माहिती त्यांनी दिली.
बेळगाव भारतात आहे हे महत्त्वाचे
एनआरसीनिमित्त महाराष्ट्र-कर्नाटकातील बेळगावचा प्रश्न आणि त्यातून केली जात असलेली वादग्रस्त विधाने या संदर्भात बोलताना आपल्यासाठी सध्या बेळगावचा प्रश्न महत्त्वाचा नसल्याचे प्रकाश आंबडेकरांनी सांगितले.
काय सांगता - युरोपची कंपनी करतेय थेट बांधावरून कारले खरेदी
बेळगाव महाराष्ट्रात असले काय किंवा कर्नाटकात? ते भारतात आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बेळगाव भागाचा दौरा केला तेव्हा असे जाणवले, की काहींच्या मते आम्ही बेळगावात ठीक आहे तर काहींची महाराष्ट्रात सामील व्हावे अशी इच्छा आहे. त्यामुळे तूर्तास हा महत्त्वाचा मुद्दा नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.