Video : सव्वाशे दिवसांपासूनचे असेही आंदोलन! 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 8 जानेवारी 2020

औरंगाबाद : आपण आठ दिवस, पंधरा दिवस चालणारी आंदोलने पाहिली आहेत; मात्र थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी मराठवाडा रस्ते इमारती व पाटबंधारे कामगार युनियनचे चक्‍क मागील 126 दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंडळासमोर आंदोलन सुरू आहे. अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. 

सार्वजनिक बांधकाम पूर्व व पश्‍चिम विभागांतर्गत विविध ठिकाणी रोजंदारी कामगारांचा 1 मे 2018 पासून पगारच दिलेला नाही. याबाबत अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वारंवार विनवण्याही केल्या. त्यावर आपण पगार देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले; मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत काहीही कारवाई केली नाही.

त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या या कामगारांनी कुटुंबीयांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर पावसाळ्यात म्हणजे 4 सप्टेंबर 2019 पासून बेमुदत आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे त्यास 126 दिवस उलटले आहेत. याबाबत बोलताना किशोर शिरसाठ म्हणाले, की आमच्या हक्‍काच्या पगारासाठी आंदोलन सुरू केले. पावसाळ्यातही हे आंदोलन सुरूच होते.

हेही वाचा :

औरंगाबादेत बॅंकांच्या संपामुळे कोट्यावधींचे व्यवहार ठप्प ; ही बॅंक मात्र आहे सुरू 

कामगार, कष्टकऱ्यांशी पंगा घ्याल तर महागात पडेल

आता हिवाळ्यात लोक आपापल्या घरात चार-चार चादरी अंगावर घेऊन झोपत आहेत; मात्र इथे आम्ही कडाक्‍याच्या थंडीत एक चादर अंगावर घेऊन आंदोलन करीत आहोत. या आंदोलनाची दखल न घेतल्यास आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. आंदोलनात चरण गोडबोले, लखन बोरडे, कचरू साळवे, रमेश दाभाडे, संतोष शिंदे, राम भंडारी, रेखा गोडबोले, सुलाबाई साळवे, चतुराबाई दीपके, मंडाबाई शिंदे, कमलाबाई हिवराळे, कमलबाई हिवाळे, फातेमाबी शेख, सोनाबाई जमधडे यांचा समावेश आहे. 

पैसेच नाहीत, म्हणून चहासाठी मांडली चूल 
पगारच मिळाला नसल्याने दिवसभरात पाच ते सहा वेळा बाहेर जाऊन चहा पिण्यास पैसेच नाहीत. त्यामुळे आंदोलक कामगारांनी आंदोलनस्थळीच चूल मांडली आहे. आंदोलनातून वास्तव दाखविणाऱ्या या आंदोलनाची चर्चा होत आहे; मात्र दखल होत नसल्याने आंदोलकांनी खंत व्यक्‍त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest Since 125 Days By Pwd Union Aurangabad News