सभापतीपदी पुन्हा राधाकिसन पठाडे, न्यायालयाच्या आदेशानंतर जल्लोषात स्वीकारला बाजार समितीचा पदभार

Aurangabad AMPC News
Aurangabad AMPC News

औरंगाबाद : बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाकडे रद्द केला. यानंतर सभापती राधाकिसन पठाडे यांनी सोमवारी (ता.१) पुन्हा पदभार स्वीकारला. हा निकाल लागल्यानंतर बाजार समितीत पठाडे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सभापती राधाकिसन पठाडे, संचालक वाघ, अडत व्यापारी असोसिएशनचे कन्हैयालाल जैस्वाल, देविदास किर्तीशाही, भाजपचे पदाधिकारी बाजार समितीत दाखल झाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत गुलाल उधळताना एकच जल्लोष केला, त्यानंतर बाजार समितीचे प्रशासक असलेल्या जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांची भेट घेत चर्चा केली. दुपारपर्यंत न्यायालयाची प्रत आली नव्हती. यामुळे दुपारी उशिरा त्यांनी पदभार स्वीकारला. सभापती राधाकिसन पठाडे म्हणाले की, न्यायालयाने योग्य न्याय दिली. बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्याची मागणी आम्ही संबंधित विभागाकडे केली होती.

मात्र, विभागाने मुदतवाढ न देता प्रशासक नेमला होता. या विरोधात आम्ही न्यायालयात गेला. या ठिकाणी न्यायालयाने न्याय दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बंद पडण्यात आलेली कामे पुन्हा सुरु करणार आहेत. पेट्रोल पंप, शॉपिंग कॉम्पेल्सची कामे, रस्त्याची कामे, करमाड उपबाजारपेठेचे कामे, व्यापाऱ्यांना गाळे बांधण्यासाठी देण्यात आलेले कामे पूर्ववत करणार आहेत. येत्या आठवड्याभरात संचालक मंडळाची बैठक घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व प्रलंबित मागण्याही पूर्ण केल्या जातील.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com