मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना

मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना


औरंगाबाद: ‘मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना, लहू से मेरी पेशानी पे हिन्दुस्तान लिख देना’ ही दमदार शायरी आहे राहत इंदौरी यांची. शायरी, शब्दांचा बादशाह असलेल्या राहत इंदौरी यांनी ११ जानेवारी २०२० रोजी औरंगाबादेतील मौलाना आझाद कॅम्पस मधील रोनख-ए-शाम या मुशायऱ्यात हजेरी लावली होती. तब्येत चांगली नसतांनाही त्यांनी मंचावर येत सर्वात अगोदर ‘मैं बिमार हु बेकार नही हु’ असे म्हणत सुरवात केली होती.

डॉ. ए. ए. कादरी मानसिक आरोग्य केंद्र, ऑल इंडीया पयाम-ए-इन्सानियत आणि मौलाना आझाद कॉलेजतर्फे रफीक झकेरिया कॅम्पसमध्ये रोनख-ए-शाम मुशायरा झाला होता. त्यावेळी आजारी असतानाही त्यांनी तब्बल ३५ मिनिटे मनाला भिडणारे एकापेक्षा एक शेर सादर केले होते. या मुशायऱ्यात प्रसिद्ध शायर कैसर खालेद, विजय तिवारी, शाहीद अंजूम, तनवीर गाजी, शरफ नानपरवी, एकबाल अशार, शबीना आदिब, मुमताज नसीम, नुह आलम यांची उपस्थिती होती.

११ जानेवारीच्या मुशायऱ्यात राहत इंदौरी म्हणाले होते की, माझ्या आयुष्यात औरंगाबादेतील मुशायरा सगळ्यात यशस्वी झालेले मी बघितले आहेत. 

‘अपना आवारा सर झुकाने को तेरी दहेलिज देख लेता हु 
और फिर कुछ दिखाई दे या ना दे काम की चीज देख लेता हु’ 

यानंतर ते म्हणाले होते की लाल किल्ला येथे आजच मोठा मुशायरा आहे. तेथे मलासुद्धा निमंत्रण होते मात्र मी आजारी असतांनाही औरंगाबादच्या प्रेमाखातर येथे आलो.

‘तेरी परछाई मेरे घर से नही जाती 
तु कही हो मेरे अंदर से नही जाती 
आसमा मैंने तुझे सर पे उठा रखा है 
यह तोहमत मेरे सर से नही जाती’ 

यानंतर त्यांनी समोर काही राजकारणी बघितले. त्यांच्याकडे बघत त्यांनी मी मुशायऱ्यात राजकारणांचे नाव घेणे सोडले आहे असे सांगितले. केरळमधील एका राजकारण्याने मला जेहादी संबोधले होते. मी सत्तर वर्षाचा झालो मात्र मलाच मी जेहादी आहे हे माहित नव्हते. यानंतर त्यांनी आणखी एक शेर सादर केला... 
‘मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना, 
लहू से मेरी पेशानी पे हिन्दुस्तान लिख देना’ 

जबरदस्त प्रतिसादानंतर ते आणखी खुलले आणि... 
‘उठा शमशिर दिखा अपना हुनर क्या लेगा 
ये रही जान, ये गर्दन है, क्या लेगा’ 
सिर्फ एक शेर उडा देगा परख तेरे 
तु समझता है शायर है ये कर क्या लेगा’ 

यानंतर त्यांना उपस्थित स्त्रोत्यांनामधून ‘किसी के बाप का हिन्दोस्तान थोडी है’ शेर सादर करण्यांचा आग्रह धरण्‍यात आला. त्यावर... 

अगर ख़िलाफ हैं होने दो, जान थोड़ी है 
ये सब धुआँ है कोई आसमान थोडी है 
लगेगी आग तो आएँगे घर कई जद में 
यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है 
जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे 
किराएदार हैं जाती मकान थोडी है 
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में 
किसी के बाप का हिन्दोस्तान थोडी है 

यावर टाळ्यांच्या कडकडाटात मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच २६ डिसेंबर २००१६ रोजी औरंगाबाद महापालिकतर्फे जगदगुरु संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कुल हिंद मुशायऱ्यात सुद्धा राहत इंदौरी यांनी हजेरी लावली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com