राज ठाकरेंनी अर्ध्यातच गुंडाळला औरंगाबाद दौरा; उद्याच जाणार माघारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आलेले राज ठाकरे आपला दौरा एक दिवस आधीच गुंडाळणार आहेत. तीन दिवसांचा दौरा दौनच दिवसांत आटोपून ते उद्या शनिवारी (ता. १५) मुंबईला माघारी जाणार आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आलेले राज ठाकरे आपला दौरा एक दिवस आधीच गुंडाळणार आहेत. तीन दिवसांचा दौरा दौनच दिवसांत आटोपून ते उद्या शनिवारी (ता. १५) मुंबईला माघारी जाणार आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात प्रथमच रोड शो केला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य सळसळू लागले. मनसे पदाधिकाऱ्यांनी शहरात मोठी बॅनरबाजीही केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा मुद्दाही पळवून नेत त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची चांगली वातावरण निर्मिती केली.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार उद्धव ठाकरेच

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या तीन दिवसांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मनसेने केले होते. शिवसेना-भाजपमधील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांचा मेळावा, समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका असे भरगच्च नियोजन असताना राज ठाकरे मात्र उद्या सकाळीच मुंबईला माघारी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही ठराविक कार्यक्रम आधीच उरकून घेत पदाधिकारी मेळाव्याला आपण हजर राहणार नसल्याचे मनसेच्या स्थानिक नेत्यांना राज यांनी स्पष्ट केले आहे.  याशिवाय शिवसेना -भाजपमधून मनसेत प्रवेश करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनाही काही काळ थांबण्याचा निरोप देण्यात आला आहे. 

मुलींचे नखरे आणि मुलांची मिन्नतवारी

राज ठाकरे यांनी आपला दौरा गुंडाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पण उद्या कृष्णकुंजवर महत्त्वाची बैठक असल्यामुळे राज ठाकरे परत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जाण्यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती इच्छुक उमेदवारांच्या याद्या आणि आढावा राज यांना सादर करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray In Aurangabad Maharashtra News