esakal | औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर; मुख्यमंत्री देतील सुखद धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे; लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादकरांना सुखद धक्का देतील अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'सकाळ'ला दिली.

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर; मुख्यमंत्री देतील सुखद धक्का

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे; लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादकरांना सुखद धक्का देतील अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'सकाळ'ला दिली.

दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नामांतराच्या प्रक्रियेसाठी माहिती घेत आहेत. जी कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण झाली आहे. लवकरच याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. महाविकास आघाडीकडून यासाठी कोणतीही आडकाठी असणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते संभाजी महाराजांना मानणारे आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध असणार नाही, असे खैरे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांची झाली कोंडी

राज ठाकरे यांनी संभाजीनगरचा मुद्दा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाती घेतला असला तरी त्यांनी तो सोडू नये, असा टोला लागवत लवकरच निर्णय होणार असल्याने येत्या निवडणुकीत संभाजीनगर की औरंगाबाद हा मुद्दाच असणार नाही, त्यावेळी फक्त संभाजीनगर असेल, असेही खैरे म्हणाले. 

काय आहे औरंगाबाद की संभाजीनगर मुद्द्याची पार्श्वभूमी

औरंगाबाद या शहराचे सुरुवातीला नाव होते खडकी. औरंगाबाद परिसर हा बेसाल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात प्राचीन खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले, अशी इतिहासात नोंद आहे. 

मुलींच्या कोणत्या नखऱ्यांनी मुले होतात घायाळ

त्याकाळी निजामाचा वजीर मलिक अंबर होता. नहर ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्याने या गावाचं शहर केले. मात्र त्यानेही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतराने १६३३ मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 

१६५३ मध्ये औरंगजेब दक्षिण विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्याने पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरून खुजिस्ता बुनियाद असे ठेवले. कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे ते औरंगाबाद हे नाव मिळाले. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.

कर्क राशीची आज परीक्षा, मीन-धनूने राहावे सावध

१९८८ मध्ये औरंगाबादच्या सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 

९ नोव्हेबर १९९५ या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे  नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र २००१ ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला. आतापर्यंत ३२ वर्षात शिवसेना आणि भाजपकडून हाच मुद्दा सर्वच निवडणुकांसाठी वापरला जात होता.

go to top