सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची हवा

Aurangabad News Raj Thackeray
Aurangabad News Raj Thackeray

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा भगवा आणि अजेंडा हिंदुत्ववादी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (ता. 13) पहिल्यांदाच शहरात आले आहेत. बदललेल्या भुमिकेनंतर त्यांचा राज्यातील पहिलाच दौरा असल्याने मनसैनिकांनी जंगी स्वागत केले. मनसेच्या स्थापनेनंतरही औरंगाबादेत पहिल्यांदाच रोड शो केला. यातही त्यांनी थेट सेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीत धडक मारली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. महावीर चौकात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे आगमन झाले. गुलाबपुष्पांची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तिथून पुढे जाताना अदालत रोडवर वाहन थांबवून सत्कार केला.

क्रांती चौकात क्रेनच्या सहाय्याने राज ठाकरेंना पुष्पहार घालण्यात आला. गुलमंडी, खडकेश्‍वर येथेही जंगी सत्कार झाला. त्यानंतर व्हीआयपी रोडने विभागीय आयुक्‍त कार्यालय मार्गे टीव्ही सेंटर दरम्यान रोड शो निघाला. टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रोड शो चा समारोप केला. यावेळी "संभाजी महाराज कि जय'च्या घोषणांनी मनसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

असा हा राज ठाकरेंचा करिष्मा
रोड शोमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान, राज ठाकरे यांनी बऱ्याचदा गाडीतून उतरुन सत्कार स्विकारले. त्यासोबतच दरवाजा उघडून वाहनातूनच लोकांना अभिवादन केले. जागोजागी उभ्या असलेल्या नागरिकांनी राज ठाकरेंची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ, सेल्फी घेणाऱ्यांचीही झुंबड उडाली होती. पुर्ण रोड शो मध्ये फुलांच्या उधळण झालीच शिवाय जागोजागी फटाके फोडण्यात आले. मनसैनिकांनी दुचाकी आणि चारचाकीतून रोड शो मध्ये सहभाग घेतला.

मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजु पाटील, मनसे नेते अभिजीत पानसे, अनिल शिदोरे, जावेद शेख, संघटक वसंत फडके, सुधीर पाटसकर औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. मनसेने शहरात केलेल्या शक्‍तीप्रदर्शनात माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे, दिलीप बनकर या नव्याने आलेल्या शिलेदारांसह जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, शहरअध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, गौतम आमराव, संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com