CoronaVirus : रेशनची सत्तर टक्के दुकाने बंद, उघड्या दुकानात मालाचा पत्ताच नाही

अनिल जमधडे
Friday, 27 March 2020

धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. 

औरंगाबाद : सरकारी पातळीवर मुबलक धान्य उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरीही स्वस्त धान्य दुकानात प्रत्यक्ष मात्र साठा उपलब्धच नाही. शहरात ७० टक्के स्वस्त धान्य दुकाने बंदच आहेत. जी दुकाने उघडी आहेत, त्यांच्याकडे शासनाकडून कोणताही कोटा पुरवठा करण्यात आलेला नाही. असे थेट भेटी दिल्यानंतर आढळून आले. त्यामुळे तातडीने धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यात जिल्ह्याची लोकसंख्या एकूण २९ लाखांच्या जवळपास आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १४ लाख ५० हजारांच्या जवळपास आहे. म्हणजे सर्व जिल्ह्यातील ५० टक्के लोकसंख्या ही फक्त शहरात राहते. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३१ मार्चपर्यंत शटडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून शहरातील सर्व बाजारपेठा दुकाने, धंदे, व्यापार, उद्योग, शाळा, महाविद्यालय, मंदिरे, मस्जीद यासर्व शासनाच्या आदेशाने बंद झालेली आहे. औरंगाबाद शहरवासियांना याला मोठा प्रतिसादही दिला; मात्र प्रशासनाच्या वतीने शहराती जनतेसाठी उपाययोजना काय केल्या? हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाच्याकडून ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी (ता. २८) शहरातील प्रत्येक वार्डातील स्थानिक एका कार्यकर्त्यांनी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानास भेटी दिल्या. त्यावेळी असता जवळपास ७० टक्के स्वस्त धान्य दुकाने बंद दिसले. तर ३० टक्के स्वस्त धान्य दुकाने चालू स्थितीत मिळाली; परंतु त्यांच्याकडे राशन कार्ड धारकांसाठीसुद्धा वाटप करण्याकरीता स्वस्त धान्य दुकानातील शासनाकडून कोणताही कोटा पुरवठा करण्यात आलेला नाही असे दिसून आले. एवढा मोठा शटडाऊन चालू असतानासुद्धा प्रशासनाने कोणतेही तयारी केलेली दिसत नाही आज बऱ्याच वार्डांमध्ये स्लम एरिया किंवा कामगार निवासी कॉलनी ज्यांचा रोजंदारीवर घर चालते अशा लोकांना स्वस्त धान्याची गरज असतानासुद्धा प्रशासनाने जनतेला स्वस्त धान्य व इतर सुविधा उपलब्ध करुन दिलेले दिसत नाहीत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ही गंभीर बाब आहे, असे आम आदमी पार्टीचे नेते सुग्रीव मुंडे यांनी प्रशासनास पाठविलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे. औरंगाबाद शहरातील राशन दुकानांची उपस्थिती गंभीर आहे. प्रशासन याला पाहिजे त्या गतीने काम करतांना दिसत नाही जर लोकांच्या पोटाला अन्न नसेल तर जनता रोगा पेक्षा भुकेने व्याकुळ होण्याची चिन्हे आहे. म्हणून आम आदमी पार्टी प्रशासनास विनंती करीत असून, तत्काळ याबाबींकडे लक्ष देऊन अन्न धान्याची पूर्तता जनतेकरीता तत्काळ करावी अशी मागणी केली आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ration shop closed News