औरंगाबादमध्ये संचारबंदी फक्त नावालाच... 

Read more about why the state was banned ...
Read more about why the state was banned ...

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर शासनाने मंगळवारपासून (ता.२४) राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, औरंगाबादमध्ये पहिल्याच दिवशी संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. आपात्कालीन परिस्थितीत रिक्षा चालकास एक प्रवाशी घेऊन जाण्याची मुभा आहेत.

 मात्र अनेक रिक्षातून एक व्यक्तीऐवजी चार ते पाच प्रवाशांना घेवून प्रवास केला जात आहे. या प्रकाराकडे पोलिसांनी कानाडोळा करत आसल्याचे सध्याचे चित्र आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडूच नये असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहेत. त्यासाठी राज्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले होते. पंरतू, नागरीकांकडून या आदेशाचे उल्लघन करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावरील वर्दळ काही कमी होताना दिसत नाही. शासनाने कठोर पाऊले उचलत मंगळवारपासून संचारबंदी लागू केली आहे. 

मात्र, या संचारबंदीचाही नागरीकांवर काहीही परिणाम झालेला नाही. काही महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा पडू नये, असे आदेश आहेत. तसेच रिक्षात एकच व्यक्ती तर कारमध्ये फक्त दोन व्यक्तींना बसवावे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी बंदी आहे. असे आसतानाच मंगळवारी (ता.२४) वसंतराव नाईक चौक (सिडको) येथून बीड आणि जालना शहरासाठी सर्रास अवैध वाहतूक सुरू होती. येणाऱ्या प्रवाशांना हात धरून वाहनात बसविण्यात येत होते. खासगी क्रुझर, कार आणि ॲपेरिक्षांच्या माध्यमाने करमाड, बदनापूर, जालना अशी वाहतूक करण्यात होती. 

मुकूंदवाडी, चिकलठाण्यासाठी रिक्षातून अवैध वाहतूक करणे सुरुच होते. एका रिक्षातून किमान चार ते पाच प्रवासी भरुन नेण्याचा सपाटा रिक्षावाल्यांकडून सुरुच होता. सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलिसां देखत हा प्रकार सुरु होता. नागरिक व रिक्षाचालकांकडुन होणाऱ्या नियमाच्या उल्लघंनावर पोलिसांकडुन करावाई कुठलीच कारवाई करण्यात येत नव्हती. 

प्रवाशांची केली लूट 
या चौकातून जालनासाठी तीनशे रुपये, तर बीडसाठी पाचशे रुपयांपर्यंत अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करण्यात आली. विशेष म्हणजे एका वाहनात कोंबून बसवलेल्या अनेकांनी मास्क लावावा किंवा रुमाल बांधावे नव्हते. यामुळे कोरोनाचा विषाणु वाढीस लागण्यासाठी वेळ लागणार नाही. चौकामध्ये असलेल्या पोलिसांनी या अवैध वाहतुकीला रोखण्याची तसदी घेतली नाही. अशी परिस्थिती दुपारी तीनपर्यंत होती. वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, हे जरी खरे असले तरीही वाहतूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com