
औरंगाबाद - प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शहर व जिल्हावासीयांना सहन करावा लागत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाला ती व्यक्ती बाहेरून आल्याचे कळते. यावरूनच अधिकारी किती जबाबदारी निभावतात, हे स्पष्ट होते. या परिस्थितीचा शुक्रवारी (ता.२४) पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून कोरोनाचे युद्ध जिंकणारच, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला विश्वास आपण सर्व मिळून सार्थ ठरवू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
ऑरिक प्रकल्पांतर्गत निधी
व्हेंटिलेटर उपलब्धता, रास्त दुकानदारांच्या तक्रारी व केलेली कारवाई, शिवभोजन थाळीची तत्काळ पूर्तता करणे, पवित्र सण रमजानच्या अनुषंगाने पोलिस विभागाने घ्यावयाची खबरदारी व कार्यवाही, कोरोनाच्या मृत रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी करावयाची कार्यवाही आदींबाबत देसाई यांनी संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही याबाबत देसाई यांना माहिती दिली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत तपासणी व संशोधनाच्या अनुषंगाने एक कोटी रुपयांचा विशेष निधी ऑरिक प्रकल्पांतर्गत सीएसआरमधून उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे सदर अद्ययावत केंद्र कोरोना उपचारावर तपासणी नव्हे तर संशोधन करणारेही महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र ठरेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
मंत्री, पदाधिकाऱ्यांच्या सूचना
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांना २५ लाख रुपयांचा विमा तातडीने देण्यासाठी शासनस्तरावर अंमलबजावणी करावी.’’ ग्रामीण भागातील छोट-छोटे उद्योगसुद्धा चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली. आमदार अतुल सावे यांनी छोट्या उद्योगांना परवानगी द्यावी, आमदार सतीश चव्हाण यांनी विशेष परवानगी देण्यात आलेल्या वाहनांनाच इंधन देण्याची सूचना केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे, प्रशांत बंब, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, संजीव जाधवर, महादेव किरवले उपस्थित होते.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
खासगी रुग्णालये बंद का?
जिल्हाधिकारी यांनी सूचना देऊनही पैठण तालुक्यातील सर्व खासगी दवाखाने सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत बंद आहेत. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांचे हाल होत आहेत. म्हणून खासगी दवाखाने चालू राहतील यासाठी शासनाकडून आदेश द्यावेत, अशा सूचना फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी केल्या.
रुग्णांना दाखल करण्यास का देतात नकार?
कोरोना व सारीव्यतिरिक्त इतरसुद्धा रुग्ण आहेत; परंतु सदर रुग्णांना शासकीय योजनेतून उपचारासाठी कमलनयन बजाज हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल व महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल हे शहरातील मोठे हॉस्पिटल रुग्णांना दाखल का करून घेत नाहीत, असा सवाल खासदार जलील यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.