शहागंजच्या घड्याळाचे २९ लाखात सुशोभीकरण ; टॉवरचे होणार संवर्धन

माधव इतबारे
Thursday, 17 December 2020

शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाचे टॉवर १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आले आहे. ते मुगल, निजाम आणि ब्रिटिश शैलीतील वास्तूंचा मेळ घालणारे आहे. या टॉवरचे संवर्धन व घड्याळाची दुरुस्ती स्मार्ट सिटी अभियानातून केली जात आहे.

औरंगाबाद : शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाच्या दुरुस्तीचे काम स्‍मार्ट सिटी अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी २९ लाख ११ हजार रुपये खर्च केला जाणार असून, हे काम येत्या दहा दिवसात सुरू होणार आहे. कंत्राटदाराला कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा : औरंगाबाद-वाळूज रस्त्यावरील रेल्वे पुलावर लेनची शिस्त पाळा ; उद्योग संघटना, पोलिसांचे आवाहन

शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाचे टॉवर १९०१ ते १९०६ या काळात बांधण्यात आले आहे. ते मुगल, निजाम आणि ब्रिटिश शैलीतील वास्तूंचा मेळ घालणारे आहे. या टॉवरचे संवर्धन व घड्याळाची दुरुस्ती स्मार्ट सिटी अभियानातून केली जात आहे. यासंदर्भात एससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, ऐतिहासिक टॉवरचे संवर्धन केल्यास जुन्या शहराचे हरवलेले वैभव परत मिळण्यास मदत होईल.

हे ही वाचा : ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा इसकाळचे ऍप 

घड्याळ दुरुस्ती आणि सुशोभीकरण प्रकल्पाची अंदाजे किंमत २९ लाख ११ हजार रुपये असून कामाचे आदेश दिल्यानंतर चार महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. कंत्राटदाराने बँकेची हमी दिल्यानंतर दहा दिवसात काम सुरू होणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कळ शिवम् यांनी सांगितले. साफसफाई, जीर्णोद्धार तसेच पृष्ठभागावरील कलात्मक घटकांची रचना तसेच मजबुतीकरण करणे. विटांच्या पृष्ठभागास मूळ सामग्रीसह पुनर्स्थित करणे. पडझड झालेला भाग पुन्हा बांधणे, अशा कामांचा यात समावेश असल्याचे साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The repair work of the historical clock at Shahganj will be done under the Smart City campaign