esakal | पोलिसांच्या विनंतीचा मान राखत आंदोलन मागे, पण उद्या मशिद उघडणार : खासदार इम्तियाज जलील
sakal

बोलून बातमी शोधा

Khasdar Imtiaz Jaleel

आज गणेश विसर्जन असल्याने पोलीस प्रशासनाने पुजाऱ्यांना निवेदन देण्याचे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यामुळे आंदोलन मागे घेतले मात्र उद्या बुधवारी (ता.दोन)आम्ही मशिद उघडणार आहोत. शहागंज येथील मशिदीत दुपारी सामूहिक नमाज अदा करू असे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पोलिसांच्या विनंतीचा मान राखत आंदोलन मागे, पण उद्या मशिद उघडणार : खासदार इम्तियाज जलील

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने धार्मिक स्थळे उघडावी ही आमची मागणी आहे. आज गणेश विसर्जन असल्याने पोलीस प्रशासनाने पुजाऱ्यांना निवेदन देण्याचे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. मात्र उद्या बुधवारी (ता.दोन) आम्ही मशिद उघडणार आहोत. शहागंज येथील मशिदीत दुपारी सामूहिक नमाज अदा करू असे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मंदिर उघडण्यावरुन शिवसेना एमआयएम आमने-सामने, आंदोलन मागे

मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे जाहीर केल्यापासून शिवसेना आणि एमआयएममधील राजकीय वातावरण वातावरण चांगलेच तापले होते. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी (ता.एक) दुपारी दोन वाजता खडकेश्वर येथील मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्या अगोदर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , आमदार अंबादास दानवे येथे दाखल झाल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच मनसे जिल्हाध्यक्ष सुभाष दशरथे होते. हे सुद्धा कार्यकर्त्यांचा दाखल झाले होते. त्यानंतर एमआयएमने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

याविषयी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, हिंदुत्वाची भाषा करणारे सरकार सर्व व्यवहार सुरळीत करते. मात्र धार्मिक स्थळे उघडत नाही. त्यामुळे एक तारखेला मंदिर तर दोन तारखेला मशीद उघडण्याचे आंदोलन आम्ही जाहीर केले होते. मात्र इतके दिवस झोपलेले आमच्या आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर लगेच जागे झाले. आम्ही सर्व धार्मिक स्थळे उघडावे अशी मागणी केलेली आहे.

एमआयएमचे मंदिर प्रेम एक स्टंटबाजी : आ. अंबादास दानवे यांनी साधला निशाना

यामध्ये फक्त मंदिराचा प्रश्न नाही. मंदिर आणि धार्मिक स्थळे सुरु झाली तर त्याच्या आजूबाजूला असलेली दुकाने सुद्धा सुरू होतात. फुलांमुळे शेतकऱ्यांना सुद्धा मदत होते. सहा महिन्यांपासून यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. आता पोलिसांनी आवाहन केल्यानंतर हे आंदोलन आम्ही मागे घेतले आहे. जर धार्मिक स्थळे उघडली नाही तर आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ आता बुधवारी दुपारी आम्ही शहागंज येथील मशिदीत सामूहिक नमाज अदा करणार आहोत.

(संपादन - गणेश पिटेकर)