राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘आपत्ती विमोचन समिती’ची स्थापना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

‘आपत्ती विमोचन समिती’ उदभवलेल्या समस्या निवारणाचे तसेच समाजात जनजागृती करण्यासाठी ही समिती कार्यरत असेल. समाजात कार्यरत असलेल्या विविध संस्था, संघटना यांना सोबत घेऊन ही समिती कार्यरत असेल.

औरंगाबाद: सध्या कोरोनामुळे अनेक जण भयभीत आहेत. देशात ही कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून येताहेत. समाजातील प्रत्येक घटकाला या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने या स्थितीची जाणीव ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘आपत्ती विमोचन समिती’ची अस्थायी स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या औरंगाबाद शहर निमंत्रकपदी प्रसन्नकुमार बोठे यांची नियुक्ती करण्यात आली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच कठीण परिस्थितीत संकट निवारणार्थ समाजोपयोगी कार्य केले सर्व समाजाला सोबत घेत केले आहे. समाजाकडूनही संघाला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत आलेला आहे. नुकतीच स्थापन करण्यात आलेली ‘आपत्ती विमोचन समिती’ उदभवलेल्या समस्या निवारणाचे काम करेल. तसेच समाजात जनजागृती करण्यासाठीही समिती कार्यरत असेल.

हेही वाचा- ..आरोग्य कर्मचारी ही असुरक्षित

समाजात कार्यरत असलेल्या विविध संस्था, संघटना यांना सोबत घेऊन ही समिती कार्यरत असेल. तरी समाजातील जागरूक संस्था, संघटनांनी या कार्यात एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे कार्यवाह प्रसन्नकुमार बोठे यांनी केले आहे. 

औरंगाबाद शहरात कोरोना ‘आपत्ती विमोचन समिती’ची स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये पुरुषोत्तम हेडा, संतोष पाठक, प्रविण सोनवणे, अनिल पाटील, संजय दोसी, विजय उकलगावकर, प्रज्वल दापुरकर, कण्हय्यालाल शाह, रविंद्र खिंवसरा, रमण आजगावकर, सुनिल कोळी, विशाल ढाकरे, यतींद्र अष्टपुत्रे, रेखाताई सोनुने, सिमाताई कुलकर्णी यांची समावेश आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Apatti Vimochan Samiti Aurangabad News