सिडको नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा डाव

file photo
file photo

औरंगाबाद : महपालिकेला सिडकोतील जगतगुरू संत तुकाराम नाट्यगृह चालवणे अवघड झाले आहे. नाट्यगृहाच्या उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढल्याने महापालिकेने खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याला मात्र भाजपचा विरोध कायम आहे. 

देखभालीचा खर्च अधिक 

नाट्यगृहाच्या उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीवरच भरमसाठ खर्च होत आहे. त्यामुळेच नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नगरसेवकांनी खासगीकरणास विरोध केल्यानंतरही महापौरांनी यंदाचे बजेट मंजूर करताना उत्पन्नवाढीसाठी या नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे; मात्र पालिकेत आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. 

महापौरांचा निर्णय 

संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेवरून औरंगाबाद पालिकेची राज्यभर बदनामी झाली होती. या रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी पालिका 10 कोटी 30 लाख रुपयांचा खर्च करत आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे सरकारनेही या कामासाठी निधी देण्याचे आश्‍वासन पालिकेला दिले आहे. या पार्श्‍वभूमीवरच महापौर नंदकुमार घोडेले यांनी देखभाल दुरुस्ती करणे पालिकेला परवडत नसल्याकारणाने सिडको नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 फेब्रुवारी 2018 च्या सर्वसाधारण सभेत जेव्हा खासगीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. 

भाजपचा विरोध

 खाजगीकरणाच्या प्रस्तावाला सत्तेत असतानाही शिवसेना वगळता भाजपसह सर्व नगरसेवकांनी खासगीकरणाला विरोध केला होता. त्यावेळी खासगीकरणाच्या नियम अटी काय असतील? याचा खुलासा घेण्याची मागणी भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी केली होती. भगवान घडामोडे यांनी संत एकनाथ नाट्यगृह पालिकेमार्फत चालविले जाणार आहे? मग सिडको नाट्यगृहाचे खासगीकरण कशासाठी, असा प्रश्न करत खासगीकरणाला विरोध केला होता. खासगीकरणावरून त्यावेळी शाब्दिक चकमकही झाली होती. भाजपचे रामेश्वर भादवे, माधुरी अदवंत, भाऊसाहेब जगताप, अयुब जागीरदार, विकास एडके, राज वानखेडे, शिवाजी दांडगे यांनीदेखील खासगीकरणास विरोध केला होता. 

शिवसेनेचे समर्थन 

शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ यांनी नाट्यगृह कलाकारांना उपलब्ध झाले पाहिजे, यात कोणाचे दुमत नाही; मात्र ते चांगल्या अवस्थेत असणे गरजेचे आहे, असे म्हणत खासगीकरणाला समर्थन दिले होते. आता तर भाजप पालिकेतही सत्तेतून बाहेर पडले आहे. त्यामुळे भाजपचा विरोध लक्षात घेत सेना महापौर नंदकुमार घोडेले यांनी सिडको नाट्यगृहाचे खासगीकरण करण्याचा बजेटच्या ठळक वैशिष्ट्यांत समावेश केला आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com