हृदयद्रावक! आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

खऱ्या प्रेमापोटी तिनं त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरलाही; पण त्याने जुमानले नाही. अखेर तिने एक दोन नव्हे, तब्बल चौऱ्यांशी मेसेज करुन त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तो निरर्थक ठरल्याने...

औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील एका धार्मिक संमेलनात तिची त्याच्याशी ओळख झाली. मोबाईल क्रमांकांची देवाण-घेवाण झाली. चॅटिंग सुरू झाले आणि तिथंच प्रेमांकुर रुजला. पण एक दिवस त्याने 'मला बायको आणि एक मुलगा आहे' असं तिला सांगितलं, अन्‌ तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 

खऱ्या प्रेमापोटी तिनं त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरलाही; पण त्याने जुमानले नाही. अखेर तिने एक दोन नव्हे, तब्बल चौऱ्यांशी मेसेज करुन त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तो निरर्थक ठरल्याने आत्महत्या करणार असल्याचे सांगून शेवटी तिने जगाचा निरोप घेतला. 

अत्यंत हृदयद्रावक अशी ही कहाणी. खऱ्या प्रेमाला फसव्या प्रेमाची साथ मिळाल्यानंतर काय होते, हे या घटनेवरून दिसून आले. ही 'अनामिका' औरंगाबादेत एका रुग्णालयात परिचारिका होती.

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

तिची अजयकुमार यादव उर्फ अजयकुमार ननकुप्रसाद जैस्वाल (वय 27, रा. खारेगाव, मुंब्रा) या चालकाशी परभणी येथील एका गुरुकुलमध्ये संमेलनादरम्यान ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. त्यांच्यात आधी फोन, नंतर सोशल मिडियाद्वारे गप्पागोष्टी सुरु झाल्या. 

त्याच्यावर तिचा जीव जडला. तिला प्रेम झालं. 19 ऑगस्टला ती गावी परभणीला आली. तिनं आईवडिलांना आपले अजयवर प्रेम असून, त्याच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगितले. मुलीची इच्छा पाहून कुटुंबीयांनी तिला सहमती दर्शविली. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

लग्नाची बोलणी करण्यासाठी अजयला त्याच्या कुटुंबियांना बोलवण्याचा निरोपही वडीलांनी अनामिकामार्फत दिला. तिने अजयला लग्न जुळविण्यासाठी तुझ्या कुटुंबियांना वडीलांनी बोलवल्याचे सांगितले. त्यानंतर काहीसा गडबडलेल्या अजयने एक गोष्ट सांगितली. ती बाब ऐकून अनामिका हादरली. 

त्याने दिला नकार... 

"माझे लग्न झालेले आहे. मला एक मुलगा आहे. मी लग्न करु शकत नाही,'' असे त्याने अनामिकाला सांगितले. हे ऐकून ती हतबल झाली. तिनं सारा प्रकार कुटुंबियांना सांगितला. तेव्हापासून ती तणावात होती. तिची स्थिती पाहुन कुटुंबियांनी परभणीतून औरंगाबादेत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि ते नोव्हेंबर 2019 ला गारखेड्यात राहण्यास आले होते. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

अखेर त्याने ऐकलेच नाही... 

पहिले लग्न झाले असतानाही अजयने फसवणूक केली, ही तिची भावना झाली. तरीही तिने त्याच्याशी लग्नाबाबत पुन्हा पुन्हा विचारणा केली. पण तो टाळू लागला. तिने टेक्‍स्ट, व्हॉटसऍप मेसेज करुन लग्न करण्यासाठी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने जुमानले नाही. मग तिने आत्महत्या करणार असल्याचेही त्याला सांगितले. फोटोही पाठविले. पण त्याने काही ऐकले नाही. शेवटी तिने 14 नोव्हेंबरला गळफास लावून आत्महत्या केली. 

त्याच्यावर गुन्हा दाखल 

पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले, की तिने आत्महत्येपूर्वी त्याला चौऱ्यांशी मेसेजेस केले होते. तिचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी तक्रार दिली. त्यानुसार अजय जैस्वालविरुद्ध 26 डिसेंबरला पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read How She Text Him 84 Messages and Then Reached This Stage Aurangabad Crime News