लघुशंकेला ​आडोशाला जाताय? आधी दारुडा दिसतो का बघा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

सुनील शिंदे हा कामानिमित्त मुकुंदवाडी रस्त्याने एस. टी. वर्कशॉपकडे जात होते. सुनीलला लघुशंका आल्याने तो एसटी वर्कशॉप कंम्पाउंडच्या भिंतीलगत गेला. त्यावेळी आरोपी रवी गायकवाड तेथे आला. 

औरंगाबाद : लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला दारुपिण्यासाठी दमदाटी करत त्याच्या खिशातून बळजबरी 850 रोख हिसकावून घेत धूम ठोकणाऱ्यास दोषी ठरवून चार महिने 20 दिवसांचा सक्त कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमणे यांनी मंगळवारी (ता.24) ठोठावली. रवि गायकवाड (30, रा. ब्रिजवाडी, एमआयडीसी चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

प्रकरणात सुनील शिंदे (22, रा. मिसारवाडी) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, 4 ऑगस्ट 2019 ला दुपारी सुनील शिंदे हा कामानिमित्त मुकुंदवाडी रस्त्याने एस. टी. वर्कशॉपकडे जात होते. सुनीलला लघुशंका आल्याने तो एसटी वर्कशॉप कंम्पाउंडच्या भिंतीलगत गेला. त्यावेळी आरोपी रवी गायकवाड तेथे आला. त्याने सुनीलला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावर सुनीलने पैशे नसल्याचे सांगितले. त्यामुळे रविने बळजबरी सुनीलच्या पॅन्टीच्या मागील खिशात हात घालून 850 रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेत धूम ठोकली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

चार महिने, 20 दिवस सक्तमजुरी 

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षकांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलम 392 अन्वये चार महिने 20 दिवस सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 20 दिवसांचा साध्या कारवासाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एस. बी. भागडे यांनी काम पाहिले. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four months imprisonment to rob man Aurangabad News