शेतात एकटं जाऊ नका होsss

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

सोयगावसह शिवारभर बिबट्याने सोमवारी मध्यरात्रीपासून लांबविलेला मुक्काम मंगळवारी भरदिवसा जंगलातांड्याकडे वळविला होता. त्यामुळे जंगलातांडा शिवारात मंगळवारी मजुरांमध्ये दहशत पसरली होती. 

सोयगाव (औरंगाबाद) : सोयगावसह शिवारभर बिबट्याने सोमवारी मध्यरात्रीपासून लांबविलेला मुक्काम मंगळवारी भरदिवसा जंगलातांड्याकडे वळविला होता. त्यामुळे जंगलातांडा शिवारात मंगळवारी मजुरांमध्ये दहशत पसरली होती. 

सोयगाव शिवारातील चिंचखोरी शिवारात सोमवारी मध्यरात्री आलेल्या बिबट्याने एका वासराचा फडशा पाडून मंगळवारी पहाटेच जंगलातांडा शिवाराकडे स्थलांतर केले होते. दरम्यान भरदिवसा जंगलातांडा शेती शिवारात आलेला बिबट्या पाहून मजुरांनी घराकडे पळ काढला होता,बिबट्या दिसताच मजुरांच्य अंगाचा थरकाप उडाला होता. चिंचखोरी शिवारातील एकनाथ राऊत यांच्या वासराचा फडशा पडल्याची घटना कळताच वनपाल गणेश सपकाळ यांच्यासह वनविभागाने घटनेचा पंचनामा करून बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

सोयगाव शिवारातून चिंचखोरी शिवाराकडे पळालेल्या बिबट्याने मंगळवारी दिवसभर जंगला तांड्यात धुमाकूळ चालविला होता,मात्र वनविभागाच्या पथकाच्या हाती हा बिबट्या आला नसल्याने अद्यापही बिबट्या मोकातच असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.

शेतात समुहाने जा

याबाबत वनक्षेत्रपाल राहुल सपकाळ यांनी सांगितले, की शेतात जातांना समुहाने जावे व सोबत घुंगराची काठी वापरावी, टॉर्चचा वापर करावा आणि मोबाईलवर मोठ्याने गाणे वाजवावी त्यामुळे वन्यप्राणी आपला मार्ग बदलतील व मानवी हस्तक्षेप होणार नाही. 

हेही वाचलेच पाहिजे - ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saygaon Leapord Attacking On Farmers Aurangabad News