सर तुमचे हृदय केवढे आहे : चिमुरडीने विचारला शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न

दीपक जोशी
गुरुवार, 23 जानेवारी 2020

''सर तुमचे हृदय केवढे आहे?'' असा प्रश्न तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथील प्रशालेच्या चिमुरडीने थेट शिक्षणाधिकाऱ्यांनाच विचारला आणि चटकन प्रत्यक्ष ह्रदयच शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातावर ठेवत ती  म्हणाली, ''ज्याचे त्याचे हृदय आपल्या बंद मुठी एवढे!''

लिंबेजळगाव (जि. औरंगाबाद) : ''सर तुमचे हृदय केवढे आहे?'' असा प्रश्न तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथील प्रशालेच्या चिमुरडीने थेट शिक्षणाधिकाऱ्यांनाच विचारला आणि चटकन प्रत्यक्ष ह्रदयच शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातावर ठेवत ती  म्हणाली, ''ज्याचे त्याचे हृदय आपल्या बंद मुठी एवढे!''

एवढेच दाखवून विदयार्थी थांबले नाहीत, तर त्यांनी चटचट किडनी, लहान आतडे, यकृत, स्वादुपिंड, डोळा, फुफ्फुस दाखवले. क्षणभर हे खरेखुरे मानवी अवयव आहेत की काय, असा आभास निर्माण झाला. यावर खुलाशात तिने सांगितले, की मानवी अवयवांची ओळख व्हावी यासाठी आम्ही हे प्राण्यांचे अवयव आणले आहेत.

ही गंमत घडली तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) येथील प्रशालेचे विज्ञान शिक्षक अमरसिंग चंदेल यांच्या पुढाकाराने झालेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्यात. विद्यार्थी निर्मित उपकरणांच्या प्रदर्शनाबरोबरच कृषी कक्षाचे उदघाटन, वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन, कलादालनाचे अवलोकन असा मस्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मनीषा सिद्लंबे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल कुमार सकदेव, जिल्हा  प्रकल्प समन्वयक भूषण कुलकर्णी, गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख, विज्ञान शिक्षक शिवकुमार जयस्वाल, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लोंढे, उपाध्यक्ष दादासाहेब बोरुडे, सुधीर गोळे उपस्थित होते.

वैज्ञानिक रांगोळी स्पर्धाही...

इयत्ता 6 वी ते 10 च्या 200 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन 100 मॉडेल तयार केले, तर वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी प्राण्यांचे मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळा असे विविध खरेखुरे अवयव आणून त्यांची माहिती सादर केली.

एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

जादूचा फुगा, तुषार सिंचन, टेसला कॉइल, बायोगॅस निर्मिती, ब्रिस्टल बोट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, डान्सिंग लाईट, सापेक्ष संवेदना, संसाधन व्यवस्थापन, प्रदूषण, कृषी, हरित ऊर्जा, सम्प्रेषण आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. 

यावेळी मुुख्ययाध्यापिका मनिषा वाळिंबे, अतुल गर्गे, सुदाम गायकवाड, बापू कोठावदे, तलत सय्यद, शिल्पा चौधरी, मंगला तायडे, सोपान चव्हाण, संतोष घुबे, सागर पारधी, अरुण उपळकर, उषा देशमुख, संगीता बेंडाळे, आशा चौधरी, रंजना शेवलीकर, सुधीर गोळे, महेश बोरुडे, राधिका पडघन, आसाराम केदारे, योगेश दवंगे आदींनी पुढाकार घेतला.

का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Science Exhibition In Zila Parishad School Gangapur Aurangabad Education News