औरंगाबाद ः देवेंद्र फडणवीसांची धावती भेट, कोरोनावर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मे 2020

कोरोनाचा संसर्ग कसा थांबवता येईल, त्यासाठी भाजपला काय योगदान देता येईल, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

औरंगाबाद :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत बुधवारी (ता. १३) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावती भेट घेतली. यात कोरोनाचा संसर्ग कसा थांबवता येईल, त्यासाठी भाजपला काय योगदान देता येईल, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 

श्री. फडणवीस औरंगाबाद मार्गे नागपूरला जात होते. त्यांनी औरंगाबाद येथील वाळूज जवळ एका पेट्रोलपंपावर पक्षाचे स्थानिक पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी त्यांची धावती भेट घेतली.

 ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 

या बाबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपूरसाठी बाय रोड निघाल्याचे आम्हाला कळले. त्यानुसार आम्ही त्यांची औरंगाबाद वाळूज जवळ भेट घेतली. केवळ दोन ते अडीच मिनिटे त्यांच्याशी बोलणे झाले. वाहनातून ते आमच्याशी बोलले. सध्या कोण आहे तुम्ही कशाला आले, असे फडणवीस यांनी आम्हाला सांगितले. त्यावेळी तुम्ही जात असल्याचे कळले; त्यामुळे नमस्कार करायला आलो असल्याचे आम्ही त्याना सांगितले, अशी माहिती बोराळकर यांनी दिली.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली 
 

श्री. फडणवीस म्हणाले, काळजी घ्या. कोरोनाा कंट्रोलमध्ये आणा. यासाठी भाजपकडून काय मदत करता येईल ती करा. मला नागपूरला मीटिंग असल्यामुळे निघावे लागेल असे सांगून ते नागपूरकडे रवाना झाले असल्याचेही श्री. बोराळकर यांनी सांगितले.

('फडणवीसांनी घेतली गुप्त बैठक, पंकजा मुंडे- एकनाथ खसडेंविरुद्ध नवा डाव?' मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली होती. ती चुकीच्या माहिती आधारे होती. त्यामुळे भावना दुखवल्या गेल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.)

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secret meeting of BJP in Aurangabad