औरंगाबादेत कोरोनाचे सात बळी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

घाटी रुग्णालयात आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १३१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४६, जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण १७८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना आणि इतर व्याधींनी बळी जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज (ता. १९) सात जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यात पाच पुरुष आणि दोन महिलेचा समावेश आहे. यातील घाटीत सहा मृत्यू घाटीत तर एक खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. 

घाटी रुग्णालयात आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १३१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४६, जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण १७८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती प्रशासनाने दिली. 

१) घाटी रुग्णालय परिसर येथील ४५ वर्षीय पुरुषाला १७ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर त्यांचा सांयकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १८ जूनला पॉझिटिव्ह आला. 

२) शिवशंकर कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुषाला ३१ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १ जूनला पॉझिटिव्ह आला. त्यांचा १८ जुनला दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

३) आझाद चौक, रहिमनगर येथील ४४ वर्षीय पुरुषाला १८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा सांयकाळी पाऊणे सातच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर १९ जूनला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 

४) रोशनगेट येथील ६५ वर्षीय महिलेला १८ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा १८ जुनला मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १९ जूनला पॉझिटिव्ह आला. 

५) रहेमानिया कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुषाला १३ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १३ जूनला पॉझिटिव्ह आला. त्यांचा १९ जुनला पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. 

६) आकाशवाणी येथील ६७ वर्षीय पुरुषाला १० जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा १९ जुनला सकाळी साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला. 

७) जुन्या मुकुंदवाडीतील विठ्ठल रुक्म‍िणी मंदिराजवळील ५८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा १९ जूनला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात 
मृत्यू झाला. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven CoronaPositive Patient Death Aurangabad News