esakal | ७९ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात, औरंगाबादेत आता एकुण १५ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सध्या जिल्हा रुग्णालयात १३ जणांवर उपचार सुरू आहेत. दोघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटीत दोन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.ही आकडेवारी सोमवारी रात्री दहापर्यंतची आहे. 

७९ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात, औरंगाबादेत आता एकुण १५ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबादकरांसाठी आणखी एक चांगली बातमी असून, कोविड- १९ चा संसर्ग झालेल्या ३२ रुग्णसंख्येपैकी आतापर्यंत १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणचे शहराती आरेफ कॉलनीतील ७९ वर्षीय रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप देशमुख यांनी ‘सकाळ’ला दिली. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी पाच रुग्णांना रविवारी (ता. १९) व सोमवारी सात जणांची सुटी झाली. त्यांना आता घरी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यातील पंधरा बरे होऊन घरी परतले, तिघांचा मृत्यू झाला.

सध्या जिल्हा रुग्णालयात १३ जणांवर उपचार सुरू आहेत. दोघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. घाटीत दोन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.ही आकडेवारी सोमवारी रात्री दहापर्यंतची आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटी रुग्णालय व एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिकांसह इतर स्टाफने प्रचंड घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर शहरात आता मोठे आशादायक चित्र निर्माण होत आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना - चोवीस तासांतील अपडेट 

मिनी घाटी 

 • ९६ रुग्णांची जिल्हा सामान्य रुग्णालयात स्क्रीनिंग. 
 • ५६ जणांना घरातच अलगीकरणात राहण्याचा सल्ला. 
 • ४६ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 
 • घाटीकडून जिल्हा रुग्णालयाला प्राप्त अहवालांपैकी उर्वरित ४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह 
 • ४८ नमुने तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत आहेत 
 • कोरोनामुळे आज एकही मृत्यू नाही. 
 • सध्या एकूण १२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार 

घाटी रुग्णालय 

 1. घाटी रुग्णालयात सोमवारी चारपर्यंत २४ जणांची स्क्रीनिंग 
 2. यापैकी ९ रुग्णांचे लाळेचे घेतलेले नमुने निगेटीव्ह 
 3. आतापर्यंत एकूण १२५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी 
 4. आतापर्यंत १२५ जणांचे स्वॅब निगेटिव्ह 
 5. घाटी रुग्णालयात एकूण २७ रुग्ण भरती 
 6. जिल्हा रुग्णालयातील एका पॉझिटिव्ह रुग्ण घाटीत दाखल. 
 7. तीन रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविलेआहे. 

 
घाटीत दोघांवर उपचार सुरू 

घाटी रुग्णालयात साठ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी रविवारी (ता.19) पॉझिटिव्ह आली. या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाला घाटी रुग्णालयात १९ एप्रिलला सकाळी भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रवीवारी पॉझिटिव्ह आलेल्या आणखी एका रुग्णाला घाटी येथे भरती करण्यात आले. आता घाटीत एकूण दोन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. असे घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा