esakal | महाराष्ट्र बँकेला चुना, ७१ शेतकऱ्यांनी केली एक कोटी नऊ लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ७१ शेतकऱ्यांनी  बनावट कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र बँकेला चुना, ७१ शेतकऱ्यांनी केली एक कोटी नऊ लाखांची फसवणूक

sakal_logo
By
एकनाथ हिवाळे

बिडकीन (जि.औरंगाबाद) : बिडकीन (ता.पैठण) येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ७१ शेतकऱ्यांनी  बनावट कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा बिडकीन पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.सात) रात्री दहा वाजता करणयात आला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना पीककर्ज हे वाटप करण्यात येत असून कोरोना काळात देखील शेतकऱ्यांना बँकेने  पीककर्ज वाटप करणयात आले होते. मात्र नव्याने सहा महिन्यांपूर्वी बिडकीन येथील शाखा व्यवस्थापक यांनी पीककर्ज वाटप केलेल्या शेतकऱ्यांची फेर तपासणी केली असता त्यात अनेक कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या.

पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

अनेक दस्तावेजमध्ये चुकीच्या नोंदी करून आणल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार नोटीस पाठवून देखील त्यांनी मूळ दस्तावेज बिडकीन शाखेत दाखल न केल्याने  बँकेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली असून बिडकीन शाखेचे शाखाव्यवस्थापक अवय कुमार दुबे यांनी गुरुवारी बिडकीन पोलीस ठाण्यात ७१ शेतकऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ७१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेची एक कोटी नऊ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. बहुतांश शेतकरी मुलानी वाडगाव, ढाकेफळ, तारू पिंपळवाडी, औरंगपूर, बुटेवाडी परिसरातील आहेत. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत हे पुढील तपास करित आहेत. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

इतर प्रकरणे बाहेर निघण्याची शक्यता
बिडकीन येथे १२ राष्ट्रीयीकृत बँका असून इतर बँकेत देखील अशाप्रकारे काही प्रकरणे निघण्याची शक्यता असल्याची गावकऱ्यांत चर्चा आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीयीकृत बँकेचे कार्यक्षेत्रात न येणाऱ्या गावाला देखील अनेक योजनांत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करणयात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर