औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) ७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. जिल्ह्यात आता ७८० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद: जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) ७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. जिल्ह्यात आता ७८० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार

जिल्ह्यात एकूण २ हजार १४१ रुग्णांपैकी १ हजार २५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून हे प्रमाण ५८ टक्क्यांवर (५८.५२) आले आहे. ही चांगली बाब असून आतापर्यंत १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता  कोरोना आणि इतर व्याधींनी होणारे मृत्यू रोखण्याची गरज अधिक आहे. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडताना अधिक सुरक्षित राहण्याची आणि विशिष्ट अंतर राखून व्यवहार करण्याची अधिक गरज आहे. हे केल्यासच संसर्गाचा आलेख कमी होऊ शकेल.

आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)

वडगाव कोल्हाटी (१), बजाज नगर, मोरे चौक (३), पंढरपूर परिसर (१), बारी कॉलनी (२), रोशन गेट (३), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(१), नागसेन नगर,उस्मानपुरा (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), मिल कॉर्नर (१), संजय नगर, मुकुंदवाडी (२), असेफिया कॉलनी (१), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (१), जाधववाडी (१), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (१), नारेगाव (१), एन-११, मयूर नगर, हडको (१), बिस्म‍िला कॉलनी (१),

हेही वाचापठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ

रेहमानिया कॉलनी (२), एन-आठ सिडको (१), हर्सुल परिसर (२), सिल्लेखाना, क्रांती चौक (१),  बंजारा कॉलनी (२), कटकट गेट, शरीफ कॉलनी (१), एसटी कॉलनी, कटकट गेट (२), संजय नगर, बायजीपुरा (१), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (४), वसंत नगर, जवाहर कॉलनी (१), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (२), समता नगर (२), पडेगाव (१), रोहिणी नगर (१), न्याय नगर (१), गादिया ‍विहार (२), शिवाजी नगर (१), गारखेडा परिसर (३), अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर (२),

व्हीआयपी रोड, काळीवाडा (१), सिटी चौक (२), युनुस कॉलनी (१), नूतन कॉलनी (१), रवींद्र नगर (१), दशमेश नगर (१), अरिहंत नगर (१), विद्या नगर (१), एन चार , गुरू साहनी नगर (१), अंबिका नगर (१), पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी (१), एन सहा, सिडको (१) कैलास नगर (१), रोकडा हनुमान कॉलनी (१), जटवाडा रोड परिसर (१), अन्य (१)  या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ४६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण      - १२५३
एकूण मृत्यू             - १०८
उपचार घेणारे रुग्ण - ७८०

एकूण रुग्णसंख्या    - २१४१

हेही वाचा-  मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन.... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventy Two CoronaVirus Positive Patient Found Today Aurangabad News