esakal | पठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested News

तुमचे अश्‍लील व्हिडिओ तुमच्या कुटुंबीयांना दाखवतो व सोशल मीडियावर अपलोड करून तुमची बदनामी करतो, अशी धमकी देत चक्क पोलिसालाच लाच मागणाऱ्या बहाद्दराला पोलिसांनी शुक्रवारी (ता.पाच) रात्री बेड्या ठोकल्या. दरम्यान, त्याला सोमवारपर्यंत (ता.आठ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. शृंगारे-तांबडे यांनी शनिवारी (ता.दिले) दिले. मुकेश उत्तम पुरी (४३, रा. म्हडा कॉलनी, मूर्तिजापूर) असे आरोपीचे नाव आहे. 

पठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: तुमचे अश्‍लील व्हिडिओ तुमच्या कुटुंबीयांना दाखवतो व सोशल मीडियावर अपलोड करून तुमची बदनामी करतो, अशी धमकी देत चक्क पोलिसालाच लाच मागणाऱ्या बहाद्दराला पोलिसांनी शुक्रवारी (ता.पाच) रात्री बेड्या ठोकल्या. दरम्यान, त्याला सोमवारपर्यंत (ता.आठ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. शृंगारे-तांबडे यांनी शनिवारी (ता.दिले) दिले. मुकेश उत्तम पुरी (४३, रा. म्हडा कॉलनी, मूर्तिजापूर) असे आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

प्रकरणात पोलिस शिपाई भाऊलाल हिरामण गनबास (५६, रा. मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, भाऊलाल गनबास यांची सध्या पोलिस मुख्यालय येथे नेमणूक आहे. मुकेश पुरी काही दिवसांपासून गनबास यांना तुमचे अश्‍लील व्हिडिओ तुमच्या कुटुंबीयांना दाखवतो तसेच ते सोशल मीडियावर अपलोड करून तुमची बदनामी करतो अशी धमकी देत पैशांची मागणी करीत होता. दरम्यान दोन जूनरोजी त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याला तक्रार अर्ज दिला होता.

त्यात, योगेश बन याने माझे व्हिडिओ तयार केले असून, ते व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आरोपी मुकेश पुरी हा योगेश बनच्या वतीने मला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करीत असल्याचे नमूद आहे. पाच जूनरोजी मुकेश पुरी व गनबास यांच्यात तडजोडीअंती साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र गनबास यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. मुकेश पुरी हा गनबास यांच्याकडून पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा- CoronaVirus : हंगेरीत अडकलेला औरंगाबादचा विद्यार्थी गंभीर आजारी

त्यानुसार मुकुंदवाडी पोलिसांनी सापळा रचून मुकेश पुरीला पैसे घेताना अटक केली. त्याच्या ताब्यातून साडेतीन हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे गनबास यांच्या व्हिडिओबाबत चौकशी केली असता व्हिडिओ माझ्याकडे नसून ते योगेश बनकडे असून त्याचा आणि माझा काही संबंध नसल्याचे आरोपी पुरी याने सांगितले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 
आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. आरोपीकडून गनबास यांचे व्हिडिओ जप्त करायचे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी न्यायालयाकडे केली. 

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार


 

go to top