esakal | मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन....
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

मुंबईतील एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाला बीड बायपासवर लुटल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयिताला शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता. आठ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सृंगारे यांनी शनिवारी दिले.

मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मुंबईतील एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाला बीड बायपासवर लुटल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयिताला शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता. आठ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सृंगारे यांनी शनिवारी दिले.

हेही वाचापठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ

किशोर अंबादास पवार (२४, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे संशयिताचे नाव आहे. मुंबईतील तुर्भे एमआयडीसी शाखेत व्यवस्थापक असलेले प्रशांत शिरभाते (३५, रा. नेरूळ, नवी मुंबई) हे २३ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास पत्नी प्राची व मुलगी श्रीजा असे तिघे कारने (एमएच-२७-बीव्ही-२५५५) नागपूरच्या दिशेने निघाले. रात्री पावणेअकराच्या सुमारास शिरभाते बीड बायपासवरून जात असताना तीन लुटारूंनी शिरभाते यांच्या हातातील कारची चावी हिसकावून घेतली.

त्यानंतर पैसे मागत अचानक मारहाणीला सुरवात केली. लुटारूंना प्राची यांच्या हातात चार ग्रॅमची अंगठी आणि पर्समध्ये चार तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या दिसल्यामुळे त्यांनी त्यादेखील बळजबरीने हिसकावून घेतल्या. त्यानंतर शिरभाते यांना कारची चावी दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केलेली आहे. 

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

पोलिस कोठडीत रवानगी

दरम्यान प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी आरोपी किशोर पवार याच्या साथीने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीकडुन गुन्ह्यातील उर्वरित ऐवज हस्तगत करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी न्यायालयाकडे केली.


 

go to top