
सर्वसामान्याला मंत्री करणारा नेता म्हणजे शरद पवार या शब्दांमध्ये पर्यावरण राज्यमंत्री यांनी भावना व्यक्त केल्या. इतर जात, धर्म, वर्ण आदी पाहून मंत्रिपद देतात. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सकाळने संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्या अनेक आठवणी सांगितल्या.
औरंगाबाद/उदगीर : सर्वसामान्याला मंत्री करणारा नेता म्हणजे शरद पवार या शब्दांमध्ये पर्यावरण राज्यमंत्री यांनी भावना व्यक्त केल्या. इतर जात, धर्म, वर्ण आदी पाहून मंत्रिपद देतात. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सकाळने संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्या अनेक आठवणी सांगितल्या. पक्ष स्थापनेपासून मी पवार साहेबांसोबत आहे. २०१४ मध्ये माझा पराभव झाला. त्यावेळी ते धीर देत म्हणाले, की संजय भविष्यात तुला संधी देतो. तू काळजी करु नकोस.
एका साध्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी मंत्रिपद दिले असल्याचे कृतज्ञतेची भावना राज्यमंत्र्यांनी व्यक्त केली. उदगीर येथील एका कार्यक्रमात राज्यमंत्री बनसोडे यांनी ते घालत असलेल्या जॅकेटचे कारण स्पष्ट केले होते.मुंबईत एका कार्यक्रमासाठी इंदू मिल येथे बनसोडे व धनंजय मुंडे उपस्थित होते. शरद पवार येणार म्हणून मोठी गर्दी झाली होती. मी साधी पॅण्ट व पांढरा शर्ट घातला होता. त्यामुळे त्यांना पवार यांच्या पत्रकार परिषदेत येऊ दिले गेले नाही. पवार यांनी विचारले की मंत्री संजय बनसोडे हे कुठे आहेत. ते आठ खात्यांचे मंत्री आहेत. या प्रसंगानंतर पवार साहेबांनी जॅकेट घालण्याचा सल्ला दिला असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.