शेतकरी संघटनेचे मुठभर कापुस जाळुन आंदोलन

शेखलाल शेख
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद केलेली शासकीय कापुस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरु आहे. तसेच एफएक्यू च्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसा संबंधी मागण्या आहेत.

औरंगाबादः कापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता पुर्ण राज्यभर शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालुन मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद केलेली शासकीय कापुस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरु आहे. तसेच एफएक्यू च्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसा संबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी एकाच वेळी, पुर्ण महाराष्ट्रभर मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटने केले होते. 

हेही वाचा- कोरोनाचा औरंगाबादच्या ग्रामीण भागात शिरकाव

केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काहीच केले केले नाही.

नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. राज्यातील या आंदोलनात मधुसुदन हरणे, वामनराव चटप, सरोजताई काशिकर, गोविंद जोशी, गिताताई खांडेभराड, सतिश दाणी, सीमाताई नरोडे, शशिकांत भदाने सहभाग घेतला अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. 

शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे त्यांच्या घरासमोर मुठभर कापूस जाळून शासकीय कापूस धोरणाचा निषेध करण्यात आला यावेळी कापूस उत्पादक शेतकरी श्विजयकुमार झंवर, बाजीराव हिवाळे, ऊर्मिला तवार, सुमनताई हिवाळे, सचिन झंवर, सुवर्णा हिवाळे, अक्षय तवार, गुजर यांची उपस्थिती होती.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shatkari Sanghatna cotton protest Aurangabad News