धक्कादायक: सिल्लोडमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण, ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह

सचिन चोबे
Friday, 22 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढू लागला आहे. कोरोना संसर्गापासून दूर असलेल्या सिल्लोड शहरातील पासष्ट वर्षीय महिला कोरोनाबधित झाल्याचा अहवाल गुरुवार (ता.२१) रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला आहे.

सिल्लोड : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढू लागला आहे. कोरोना संसर्गापासून दूर असलेल्या सिल्लोड शहरातील पासष्ट वर्षीय महिला कोरोनाबधित झाल्याचा अहवाल गुरुवार (ता.२१) रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला आहे. सिल्लोडमधील अब्दालशा नगर, हरी मस्जिद परिसरातील झोपडपट्टीतील पासष्ट वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अमित सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला पोटाचा त्रास होत असल्यामुळे १० मे रोजीच औरंगाबाद येथीलल खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून दहा दिवस सदर महिला तेथे उपचार घेत होती. त्यानंतर या महिलेला उपचारासाठी घाटी येथे दाखल करण्यात आले होते.

गुरुवारी (ता.२१) रोजी या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेचे दोन मुले तिच्या सोबत घाटी येथे थांबलेले आहेत. एक मुलगा चार दिवसांपूर्वी सिल्लोड येथे येऊन गेला होता. स्थानिक प्रशासनास याची माहिती संध्याकाळी उशिरा प्राप्त झाली. त्यानंतर महिला रहात असलेला परिसर रात्री एक वाजेपर्यंत सील करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

परिसर निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आला. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत या परिसरातील सिलिंग होईपर्यंत तळ ठोकून होते.

औरंगाबादेत@१२१२ पॉझिटिव्ह
औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच असताना शुक्रवारी (ता.२२) रोजच्या दिलासादायक म्हणजे सरासरीपेक्षा आज बाधितांची संख्या थोडी कमी आली आहे. आज २६ रुग्ण बाधित झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २१२ झाली आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली आहे.

आकडे बोलतात...
एकूण रुग्ण - १२१२
मृत्यू -४२
उपचार - ६५८
बरे झालेले - ५१२

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First CoronaPositive Patient in Sollod Taluka Aurangabad News