आमदाराच्या कार्यालयात राडा, शिवसेना शहरसंघटकास मारहाण 

आमदाराच्या कार्यालयात राडा, शिवसेना शहरसंघटकास मारहाण 

औरंगाबाद : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात टेंडर भरण्याच्या कारणावरून शहर संघटक सुशील खेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. औरंगाबाद पश्‍चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या कोकणवाडी येथील कार्यालयासमोरच हा राडा झाला. 

औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील सातारा-देवळाई भागातील रस्त्याच्या कामाचे टेंडर भरण्याचा वाद शनिवार (ता.18) दुपारी एक वाजेच्या सुमारास उफाळून आला. शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांनी या कामाचे टेंडर भरले होते. ते भरू नये यासाठी त्यांच्यावर दबाव होता.

टेंडर भरण्याचा वाद गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होता, या संदर्भात संजय शिरसाट आणि खेडकर यांच्यात यापुर्वीच बैठक देखील झाली होती. टेंडर भरल्यामुळे आज पुन्हा या वादावादी झाली. त्यानंतर शिरसाट यांनी खेडकर यांना आपल्या कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात बोलावून घेतले. येथे खेडकर यांना मारहाण झाली. 

सुशील खेडकर आपल्या काही कार्यकर्त्यासोबत दुपारी एक वाजेच्या सुमारास संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात आले. तेव्हा पुन्हा टेंडरच्या विषयावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर आधी शिरसाट यांच्या कार्यालयात आणि त्यानंतर बाहेर सुशील खेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिरसाट समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. वीस ते पंचवीस जणांच्या घोळक्‍याने खेडकर व त्यांच्या साथीदांराना लाथा बुक्‍यांनी तुडवल्याचे बोलले जाते.

दरम्यान, शहरसंघटक सुशील खेडकर यांना मारहाण झाली तेव्हा आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे एका कामानिमित्त शिरसाट यांच्या कार्यालयातच आले होते. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची देखील तिथे उपस्थिती होती. शिरसाट यांच्यात वादावादी झाली तेव्हा दानवे यांनी दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अशी माहिती समोर आली आहे. 
मारहाण झाल्यानंतर सुशील खेडकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. तेव्हा संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्यास त्यांना सांगण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com