esakal | औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेसह शीख बांधवांचे धरणे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena, Shikh Brother Dharna In Support Of Farmer Protest

शिवसेनेने शीख बांधवांसह दिल्ली सीमेवर सिंघु, कटोला, गाझियाबाद येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी विधेयकांविरोधातील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी औरंगाबाद येथे शनिवारी (ता.२६) धरणे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेसह शीख बांधवांचे धरणे आंदोलन

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : शिवसेनेने शीख बांधवांसह दिल्ली सीमेवर सिंघु, कटोला, गाझियाबाद येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी विधेयकांविरोधातील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी औरंगाबाद येथे शनिवारी (ता.२६) धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी केंद्र सरकार हाय, मोदी हाय, कृषी कायदे हाय, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनाला आज एक महिना पूर्ण होत आहे. दिल्लीच्या कडक्यात शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत. पंजाब, हरियाणासह देशातील शेतकऱ्यांचा आमचे नाते शेतकऱ्यांशी आहे. आमचे नाते देशाशी आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. यावेळी शीख बांधवांसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर