एकाच पालखीत सर्वधर्मीय ग्रंथ..एकात्मतेचा संदेश देणारा शिवचरित्र पारायण साेहळा

शेखलाल शेख
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

देशातील प्रत्येक माणूस हा माझा आहे मी त्याचा आहे ही आत्मिक आणि वैचारिक भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून तीन वर्षांपासून हा शिवचरित्र पारायणाचा उपक्रम राबविला जात आहे.

औरंगाबाद : श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सोहळा समितीतर्फे सर्वधर्मीय ग्रंथदिंडीने गुरुवारी (ता. 13) क्रांती चौकात सुरवात झाली. पालखीत शिवचरित्र, भारताचे संविधान, भगवद्‌गीता, बायबल, कुराण, गुरुग्रंथसाहिब तसेच गौतम बुद्धांचे ग्रंथ ठेवण्यात आले होते. शिवचरित्र पारायणाचे हे तिसरे वर्ष आहे. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, डॉ. बी. बी. चव्हाण, संयोजक प्रा. चंद्रकांत भराट यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : राज ठाकरे यांचं औरंगाबादेत मोठं वक्तव्य

राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी म्हणून शिवजयंतीनिमित्त शालेयस्तरावर हा ऐतिहासिक उपक्रम घेण्यात येतो. सर्वधर्म समभाव, बंधुता, निर्माण व्हावी म्हणून छत्रपती शिवचरित्र पारायण वाचन सप्ताह सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांनी तसेच शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

देशातील प्रत्येक माणूस हा माझा आहे मी त्याचा आहे ही आत्मिक आणि वैचारिक भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून तीन वर्षांपासून हा शिवचरित्र पारायणाचा उपक्रम राबविला जात आहे.

क्लिक करा : चवीपुरतं : पण काय ते वाचा 

यावेळी संजय लोखंडे, राजगौरव वानखेडे, भीमलाल हरणे, सुरजितसिंग खुंगर, मुकीम देशमुख, डॉ. एस. व्ही. रजवी, डॉ. जफर खान, मौलाना अब्दुल रहमान, मुक्तार कादरी, सलीम सिद्दिकी, मन्सुर शेख, देवानंद वानखेडे, रहमानी कंधारकर, नामदेव सोनावणे, मंगला निकाळजे, परिमला बिदरकर, उषा नाईक, मनोहर सुरगुडे, अवद चाऊस यांच्यासह नागरिक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivcharitra Parayan Aurangbad news