धक्कादायक... औरंगाबादेत कोरोनाने एकाच दिवसात घेतले बारा बळी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

औरंगाबादेत बुधवारी कोरोनाकंप तर झालाच शिवाय बळींची संख्याही सर्वाधिक नोंदविली गेली. एकाच दिवसात 12 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला. शहरात आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झालेला आहे.

औरंगाबाद - शहरात कोरोनाने थैमान घातले असून बुधवारी एकाच दिवसात बारा जणांचा बळी गेला आहे. यात सात महिला व पाच पुरुष असून आतापर्यंत शहरात एकूण २१८ रुग्णांचे बळी गेले आहेत. घाटीत आतापर्यंत जिल्ह्यातील १६१, शहरातील विविध खासगी रुग्णालयांत एकूण ५६, जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

जिल्ह्यातील बळी 
चेलीपुरा : पोलिस चौकीसमोर राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेला २२ जूनला घाटीत दाखल केले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २३ जूनला पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी पहाटे साडेतीनला त्यांचा मृत्यू झाला. 
हिनानगर, चिकलठाणा : ६५ वर्षीय पुरुषाला २२ जूनला घाटीत दाखल केले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २३ जूनला पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
जुना मोंढा, भवानीनगर : ६५ वर्षीय पुरुषाला १६ जूनला घाटीत दाखल केले होते. १७ जूनला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. २३ जूनला सकाळी पाऊने बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
बारी कॉलनी : २० वर्षीय महिलेला पाच जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १२ जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा २३ जूनला सायंकाळी पाऊने आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 
मंजूरपुरा : एका ५६ वर्षीय महिलेला १३ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १४ जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा २३ जूनला रात्री सव्वा नऊच्या सुमारास मृत्यू झाला. 
गाजगाव (ता. गंगापुर) : येथील एका ८० वर्षीय महिलेला २१ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २२ जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा २४ जूनला सकाळी  मृत्यू झाला. 
बंजारा कॉलनी, संतोषीमाता मंदीर : एका ७० वर्षीय महिलेला आठ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल नऊ जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा २३ जूनला मध्यरात्री मृत्यू झाला. 
उस्मानपुरा : ८२ वर्षीय पुरुषाला २२ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला. त्यांचा २४ जूनला पहाटे सव्वापाचला मृत्यू झाला. 
अजबनगर : एका ६० वर्षीय महिलेला १४ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला. त्यांचा २४ जूनला सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. 
बारुदगरनाला : एका ६० वर्षीय महिलेला १९ जूनला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल २० जूनला पॉझिटीव्ह आला. त्यांचा २४ जूनला सकाळी साडे दहाच्या सुमारास मृत्यू झाला. 

हेही वाचा- औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील वाघिणीचा मृत्यू

खासगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू 
शहरातील एका खासगी रुग्णालयात शहरातील जयसिंगपुरा भागातील ६२ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. सिल्क मिल कॉलनीतील ६२ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking ... Corona took twelve victims in a single day in Aurangabad