esakal | ना आरोग्य पथक, ना ड्रोन कॅमेरा! दहावी-बारावी पुरवणी परीक्षा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

SSC-HSC Suppliment Exam2020

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला शुक्रवारी (ता.२०) सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना अर्धा ते एक तास अगोदर येण्यास सांगण्यात आले होते.

ना आरोग्य पथक, ना ड्रोन कॅमेरा! दहावी-बारावी पुरवणी परीक्षा सुरु

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला शुक्रवारी (ता.२०) सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना अर्धा ते एक तास अगोदर येण्यास सांगण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मलगणद्वारे तपासणी करुन आत प्रवेश देण्यात आला. दरम्यान, आरोग्य पथक केंद्रावर फिरकले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहिल असे म्हटले होते. पण ड्रोन कॅमेरादेखील परीक्षा केंद्रावर दिसला नाही.

औरंगाबाद महापालिकेच्या शाळांचा आज फैसला, निर्णयाकडे पालकांचे लक्ष


कोरोनामुळे यंदाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत परीक्षार्थीची संख्या कमी होती. काही परीक्षा केंद्रावर पाच ते सहाच विद्यार्थी होते. तर दुपारच्या सत्रात झालेल्या पेपरसाठी काही केंद्रावर एक ते दोनच विद्यार्थी परीक्षेला होते. कोविडच्या अनुषंगाने सर्व केंद्रांना देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात आले होते. या परीक्षेसाठी इयत्ता दहावीचे ६ हजार ६२३ विद्यार्थी बसले आहेत. तर बारावीचे ६ हजार ७७७ विद्यार्थी परीक्षेला आहेत. शहरात १५ परीक्षा केंद्र असून, २ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षा देत आहे. दरम्यान प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथक असले असे शिक्षण विभागाने म्हटले होते.