esakal | औरंगाबाद महापालिकेच्या शाळांचा आज फैसला, निर्णयाकडे पालकांचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

2Aurangabad_Municipal_Corporation_0

शाळा सोमवारपासून (ता. २३) सुरू करायच्या किंवा नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अशी भूमिका शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. २०) जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या शाळांचा आज फैसला, निर्णयाकडे पालकांचे लक्ष

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शाळा सोमवारपासून (ता. २३) सुरू करायच्या किंवा नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अशी भूमिका शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. २०) जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार याबाबत आता उत्सुकता असून, शनिवारी (ता.२१) यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

CoronaUpdate : नव्याने ९६ जण कोरोनाग्रस्त, औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ६८३ रुग्णांवर उपचार


राज्यातील ९ वीचे १२ पर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरातील ३६१ शाळा सुरू करण्यासाठी तयारी झाली आहे. या शाळांतील नववी ते बारावीच्या विद्यार्थांची संख्या सुमारे ७८ हजार एवढी आहे तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी १०४४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

शाळाखोल्या निर्जंतूक करण्याचे कामही सुरू आहे. असे असतानाच शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. त्यामुळे शहरातील शाळा सुरू होणार का? यासंदर्भात विचारणा केली असता श्री. पांडेय यांनी, याबाबत शनिवारी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे प्रशासक काय निर्णय घेतात विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.