नातं : पुरुष वेश्‍याची गुंतागुंत

सुधीर सेवेकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

59 वी राज्यनाट्यस्पर्धा : अंतिम फेरी 

औरंगाबाद : नातं या नाटकात अनेक पात्रे आहेत. कारण दोन पिढ्या त्यात आहेत. नाट्यपूर्ण घटनाघडामोडीही पुष्कळ आहेत. कलावंत आपापली कामं नीट करतात. पण तरीही मांडणीत सुव्यवस्थितपमा, तर्कशुद्धता कमी पडतेय आणि गुंतागुंत अधिक झाली असे वाटत राहाते. त्या गुंतागुंतीत जीवनविषयीचे, स्त्री पुरुष संबंध विषयांचे, विविध नातेसंबंधविषयीच्या उलटसुलट तत्त्वज्ञानाची, दृष्टीकोनांची भर पडल्याने लेखकाचा मेसेज काय याविषयीही प्रेक्षकांच्या मनात गोंधळ उडतो. 

विमानाचे ढोलताशाने स्वागत 

कोवळ्या वयात प्रेमात पडलेल्या एका शाळकरी मुलीस तिचा प्रियकर पळून जावून लग्नं करू असं म्हणत तिला एका लॉजवर घेवून येतो. आपली वासना भागवतो, पण मुलीचे कडक व पारंपरिक विचारांचे वडील या दोघांना पकडतात. त्या पोऱ्याला शिक्षा होते. या मुलीचं तिचे वडील लग्न लावून देतात. तिचा नवरा दिर्घकाळ परदेशातच आहे. ही इकडे भारतात राहतेय. शाळकरी वयातला तो प्रियकर मुलगा शिक्षा भोगून बाहेर येतो.

वीस वर्षे उलटून जातात. हा मुलगा आता एक "जिगलो' म्हणजे पुरुष वेश्‍या झालेला आहे. हे दोघं आमने-सामने येतात. पुरुष वेश्‍या या नात्याने त्याचे अनेकींशी शारीरिक संबंध असतात. ऐश करणे एवढेच त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान असते. एक षोडशवर्षीय मुलगीही या जिगलोच्या संपर्कात आहे. ही मुलगी आपल्या दोघांच्या त्या लॉजवरच्या संबंधातून जन्मलेली आहे, असे त्याची पूर्वाश्रमीची ती प्रेयसी सांगते. कथानकात आणखीही पुष्कळ गुंतागुंत आहे. त्यात दृष्यबदलांमुळे नेपथ्याची मांडामांडही अनेकदा बदलत राहाते. 

रेल्वेचा मराठवाड्याला  पुन्हा "बाय बाय' 

दिग्दर्शकाने केलेला स्टॅच्यू म्हणजे आहे, त्या स्थितीत त्या पात्राला गोठविणे आणि तिथेच लगेच दुसरे दृष्य प्रसंग सुरू करणे हे तंत्र काही वेळा वापरले आहे. ती कल्पकता दाद देण्याजोगी. अभिनयातही नव्या पिढीतील त्या शोडषवर्षीय कन्येचा आक्रस्ताळेपणा, सडेतोडपणा, निर्भिडपमा छान व्यक्त होतो. ही मुलगी असेक्‍सुअल म्हणजे कुठल्याच लिंगाबद्दल कुठल्याच प्रकारचे शारीरिक आकर्षण न वाटणारी, अशी दाखवून लेखक गुंतागुंत आणखीन वाढवतो. पालकांनी मुलांना कसे वाढवावे या पॅरेटिंग बद्दलही चर्चा करतो. 

येळकोट : लैंगिकतेची "बोल्ड' चर्चा  

-नातं. लेखक- दिग्दर्शक, प्र. भूमिका ः प्रसाद थोरवे 
-नेपथ्य : तेजस कुलकर्णी / प्रकाश ः राजेंद्र शिंदे 
-संगीत : गुरुनाथ राऊळ मेघना शिंदे. 
-कलावंत : राहूल जगताप, प्राप्ती पाटील, सुनील जाधव, परेश बागवे, कौशिक साऊळ, विवेक राऊळे, प्राजक्ता आपटे, सुनीता फडके, वैभव दळवी, प्रियंका हजारे, प्रियंका हांडे, प्रितेश कोसाबे आदी. 
-सादरकर्ते ; शिवाईनगर सहकारी संस्था सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि व्हाईट लाईज प्रॉडक्‍शन्स ठाणे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State drama competition In Aurangabad