महत्त्वाची बातमी : औरंगाबादमध्ये या भागांत तीन दिवस वीज पुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

विविध भागांतील ग्राहकांचा वीजपुरवठा २२ ते २४ मे या काळात काही वेळ बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना काही काळ उकाड्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

औरंगाबाद : दुरुस्ती व देखभालीच्या तातडीच्या कामासाठी शहरातील विविध भागांतील ग्राहकांचा वीजपुरवठा २२ ते २४ मे या काळात काही वेळ बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना काही काळ उकाड्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
 
२२ मे 
सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत समर्थनगर, खडकेश्वर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी, नाथ सुपर मार्केट, संसारनगर, नवजीवन कॉलनी, चिंतामणी कॉलनी, उदय कॉलनी, औरंगपुरा, दलालवाडी, सुंदरनगर, बारूदगरनाला तर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पदमपुरा, कोकणवाडी, गांधीनगर, क्रांतीनगर, आयजी ऑफिस, हमालवाडी, मगरी बी कंपाऊंड, राजूनगर, बनेवाडी, कर्णपुरा, जहागीरदार कॉलनी, सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सातारा-देवळाई परिसर, बीड बायपास, आलोकनगर, दिशा नगरी, कासलीवाल मार्व्हल, रेणुकामंदिर परिसर, बजाज हॉस्पिटल, पैठण रोड, रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसर, इटखेडा, गोलवाडी, पटेलनगर, सहानगर, राहुलनगर, सिल्कमिल कॉलनी, सादातनगर, एकनाथनगर, वेदांतनगर, फ्रेंच कॉलनी, मिलिंदनगर, कबीरनगर, नागसेनगर, बन्सीलालनगर, पद्मपाणी कॉलनी, त्याचप्रमाणे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सिडको एन-दोन, एन-तीन, एन-चार, ठाकरेनगर, पारिजातनगर, स्पंदननगर, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, तिरुपती कॉलनी, एसटी कॉलनी, पुंडलिकनगर, हनुमाननगर, विश्रांती कॉलनी, मायानगर, गजानननगर, जालना रोड, सावित्रीनगर, रामनगर, म्हाडा, चिकलठाणा व ३३ केव्ही पन्नालालनगर उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरात वीजपुरवठा बंद राहील. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित
 
२३ मे
सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत छावणी परिसर, गवळीपुरा, तोफखाना, नंदनवन कॉलनी, पेठेनगर, देवगिरी व्हॅली, मिटमिटा, गारगा, तारांगण, भावसिंगपुरा परिसरात वीजपुरवठा बंद राहील. 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

२४ मे 
सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत नक्षत्रवाडी, कांचनवाडी, इटखेडा, सुधाकरनगर, शिल्पनगर, पैठण रोड, हिंदुस्थान आवास, नाथ व्हॅली रोड, आमेरनगर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार
आहे. देखभाल दुरुस्तीचे काम दिलेल्या मुदतीत अथवा त्यानंतर पूर्ण होऊ शकते. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supply line upgrade to spur power outage today