औरंगाबादेतील मंदिरे खुली, भाजपने केला जल्लोष

ई सकाळ टीम
Monday, 16 November 2020

औरंगाबाद शहरातील मंदिरे भाविकांसाठी सोमवारी (ता.१६) खुले करण्यात आले आहे. यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील सुपारी हनुमान मंदिराजवळ जल्लोष करण्यात आले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मंदिरे भाविकांसाठी सोमवारी (ता.१६) खुले करण्यात आले आहे. यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील सुपारी हनुमान मंदिराजवळ जल्लोष करण्यात आले आहे. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाविकांसाठी मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सोमवारी पाडव्याच्या मुहुर्तानुसार सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे सुरु करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करताना मास्क लावणे बंधनकारक असून तसेच शारीरिक अंतर व सॅनिटायझरचे वापर करावा लागणार आहे.

Diwali Padwa 2020 : पाडव्या निमित्ताने बाजारपेठेत अडीचशे कोटींची उलाढाल

अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे खुले करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, वंचित बहुजन आघाडी यासह इतर पक्षांनी आंदोलने व गोंधळ घालण्यात आले होते. राज्यातील कोरोना संसर्ग व रुग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील नांदेड येथील गुरुद्वारा व उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसले. मंदिरे खुले झाल्याने त्यावर उपजीविका असणाऱ्यांना आता व्यवसाय करणे सोयीचे होणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temples Open, BJP Celebration In Aurangabad