भरधाव टेम्पोन धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

रामराव भराड
Saturday, 19 December 2020

भरधाव जाणाऱ्या एका टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला.

वाळुज (जि.औरंगाबाद) : भरधाव जाणाऱ्या एका टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात शनिवारी (ता.१९) दुपारी चार वाजेच्या सुमारास नागापूर फाटा येथे झाला.
संदीप विश्वनाथ शेळके  (वय ३०, रा.धामोरी) हा  शेंदुरवादा येथून धामोरीकडे दुचाकीवरुन (एमएच २० बीडी ४२०६) होता.

 

 

त्याच वेळी टेम्पोने (एमएच ०४ एस ५५५) भरधाव येऊन धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संदीप शेळके गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान टेम्पोसह चालकास पोलिसांनी ताब्यात आहे. या प्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण बुट्टे करीत आहेत.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tempo Hit Two Wheeler, Youth Died Waluj Aurangabad News