दिवसभरात २२१७ जणांची चाचणी ; ८० जण निघाले पॉझिटिव्ह 

माधव इतबारे
Thursday, 16 July 2020

दिवसभरात एकूण २२१७ जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील २११ जणांना इंस्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले.

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने चाचण्या घेण्याचा धडाका सुरू केला असून, गुरुवारी (ता. १६) दिवसभरात अॅन्टीजेन व आरटीपीसीआर अशा २२१७ जणांच्या तपासण्या केल्या. त्यात ८० जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात १८७४ जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर ३४३ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. 

लॉकडाऊनच्या काळात शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर व करोनाबाधित क्षेत्रात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. त्यानुसार गुरुवारी सहा एन्ट्री पॉइंटवर ८५२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सोळाजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. १५ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तसेच शहरात १०२२ जणांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६४ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईल टीमच्या माध्यमातून ११७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. 

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

दिवसभरात एकूण २२१७ जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील २११ जणांना इंस्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले. अँटीजेन टेस्टमध्ये पडेगाव येथे चार, गुलमंडी येथे आठ, टीव्ही सेंटर भागात चार, खोकडपुरा भागात पाच, सिडको एन- ४ भागात दोन, कैलासनगरभागात चार, अग्निशमन विभागात एक, पारिजातनगर सिडको एन- ४ परिसरात एक, रेल्वेस्टेशन परिसरात दोन, शिवनगर भागात नऊ, छावणी परिषद हॉस्पिटलमध्ये एक तर न्यायनगरमध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 

उद्या या भागात तपासणी 
म्हाडा कॉलनी, जयसिंगपुरा, कॅनॉट प्लेस, भवानीनगर, रेल्वेस्टेशन, हर्सूल जेल परिसर, बेगमपूरा, विद्यापीठ गेट या भागात शुक्रवारी सकाळी ११ ते दोन यावेळेत अॅन्टीजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. तसेच भवानीनगर, जयभवानीनगर गल्ली नंबर-१, हमालवाडा, संभाजी कॉलनी, बायजीपुरा, दत्तनगर नक्षत्रवाडी, बाबर कॉलनी, रहेमानीया कॉलनी, पीर बाजार येथे सकाळी ११ ते सायंकाळी सहा रेणुकानगर, हर्षनगर, शिवनेरी कॉलनी एन-९, रामनगर, हडको एन-१३ याठिकाणी सायंकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत टेस्ट घेतल्या जाणार आहेत. 

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

लॉकडाउन संपल्यानंतरही स्वॅब तपासणी मोहीम  
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात ५० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी ठरविले होते. मात्र रोज दोन ते अडीच हजार टेस्ट होत असल्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरही कंटेनमेंट क्षेत्रात स्वॅब टेस्टची मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय श्री. पांडेय यांनी घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tested 2217 people in a day