esakal | सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार
sakal

बोलून बातमी शोधा

Arsenic album-30

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमिओपॅथिक गोळ्यांचा सध्या बोलबाला सुरू आहे. मात्र, ॲलोपॅथीसोबतच अगदी सहज कुठेही उपलब्ध होणाऱ्या या गोळ्या खरोखरच आर्सेनिक अल्बम आहेत का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. यासोबतच गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी होत असल्याने त्यांचा काळाबाजार होत असल्याचे होमिओपॅथिक तज्ज्ञांनी सांगितले.

सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: कोरोनाविरोधातील लढ्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमिओपॅथिक गोळ्यांचा सध्या बोलबाला सुरू आहे. मात्र, ॲलोपॅथीसोबतच अगदी सहज कुठेही उपलब्ध होणाऱ्या या गोळ्या खरोखरच आर्सेनिक अल्बम आहेत का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. यासोबतच गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी होत असल्याने त्यांचा काळाबाजार होत असल्याचे होमिओपॅथिक तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा- आनंदाची बातमी: औरंगाबादेतील साडेपाच हजार कंपन्या सुरू, १ लाख कामगार झाले रुजू

होमिओपॅथिक डॉक्टर योगेश जाधव यांच्या मते, ॲलोपॅथी मेडिकलवर सहज उपलब्ध होणाऱ्या या गोळ्यांचा डोस कसा बनवायचा हे अनेक मेडिकलचालकांना माहीत नसते, अशा वेळेस डोस योग्य आहे की अयोग्य याबाबत संभ्रम होण्याची शक्यता असतो. याशिवाय डॉ. मोहिनी काथार चौधरी यांच्या मते, होमिओपॅथी औषधीने रुग्णाला साईड इफ्केट होत नाही; मात्र गरज नसतानाही महिनोमहिने अशी होमिओपॅथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने न घेतल्यास किडनीचे कार्य योग्य पद्धतीने न होणे यासारखे साईड इफेक्ट होतात.

गोळ्या वाटल्यानेही होतोय तुटवडा
आयुष मंत्रालयाने या गोळ्यांविषयी मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते गल्लोगल्ली अशा गोळ्या वाटतात. मात्र, गोळ्या कोणत्या व्यक्तींना आवश्‍यक आहेत, एखादी व्यक्ती अगोदरपासूनच जर होमिओपॅथी औषधे घेत असेल तर त्यालाही समस्या येऊ शकते, पुन्हा दुसरे कोणी त्याच गल्लीत आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या वाटतात. मुळात प्रमाणापेक्षा जास्त खरेदी करण्यामुळेही याचा तुटवडा होत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

होमिओपॅथी मेडिकलमधूनच घ्या गोळ्या
होमिओपॅथी मेडिकलची संख्या कमी आहे, त्यामुळे ॲलोपॅथी मेडिकलमधून डायल्युशन किंवा होमिओपॅथिक गोळ्या जास्त किमतीत विक्री होते. याशिवाय यात केलेली अफरातफर ओळखता येत नाही, यावर काळजी म्हणून होमिओपॅथिक मेडिकलमधूनच किंवा होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या तज्ज्ञांकडूनच अशा गोळ्या घेण्याचा सल्ला डॉ. मोहिनी यांनी दिला आहे.

डॉ. जाधव यांच्या मते, होमिओपॅथी औषधांच्या एका ड्रममध्ये शंभर ते दीडशे गोळ्या असतात, या औषधांमध्ये चार ते पाच व्यक्तींचा दोन महिन्यांचा डोस कव्हर होतो. मात्र, एका वेळी अशा १००- १०० ड्रमची खरेदी होत आहे. त्याची साठवणूक होत आहे, शिवाय ते गरिबांपर्यंत पोचतही नाही. होमिपॅथिक डॉक्टर सर्वच वयोगटातील व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती तपासून डोस देतात, त्यामुळे ते डॉक्टरांच्या अनुमतीनेच घ्यायला हवे.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

होमिओपॅथिक औषधांचा रुग्णांवर चांगला परिणाम
ॲलोपॅथीच्या सर्वच औषधाने कोविड रुग्णावर सकारात्मक परिणाम होतो असं नाही; मात्र ब्रायोनिया अल्बा, फॉस्फरस, कॅम्फर, अॅन्टीमटार्ट, जेल्सेमियम, पल्सायटिला, कालीकार्ब, रुमेक्स, सिंकोना ऑफिशिनालिस, आर्सेनिक अल्बम-३० यांसारख्या होमिओपॅथिक औषधांचा रुग्णांवर नक्की चांगला परिणाम होतो, तोही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय. खासकरून वृद्ध रुग्णांसाठी ते फायदेशीर आहेत, असेही डॉ. योगेश जाधव म्हणाले.

या गोळ्या वाटप करण्यामागे हेतू चांगला असतो; परंतु त्याला बेस नाही. ५०० मिलीच्या बॉटलमध्ये सहा महिने मेडिसीन वापरू शकतो. हेच मेडिसन जर १०-१० लिटर एखाद्या कॉलनीत वाटले जात असेल तर टंचाई होणारच. मुळात मोठमोठ्या कंपन्यांकडून हे लिक्विड मागविले जात आहे, त्यामुळे अधिकच टंचाई निर्माण होत आहे.
-डॉ. योगेश जाधव, होमिओपॅथी तज्ज्ञ

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत